किंग्ज इलेव्हन पंजाब आज भांगडा करणार का?
आयपीएल 2020 चा ३८वा सामना दुबई क्रिकेट मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटलमध्ये खेळवण्यात येणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब सध्या नऊ सामन्यात सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. केएल राहुलच्या पंजाबला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित पाच सामन्यात कमीत कमी चार विजयांची आवश्यकता आहे. पंजाब ने पाच पैकी चार सामने जिंकले तरी त्यांना इतर प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी इतर संघांवर अवलंबून रहावे लागेल.
पंजाब संघाचे प्लेऑफ मध्ये जाण्याचे स्वप्न कोलकत्ता नाइट रायडर्स संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. कोलकत्ता नाईट रायडर्स सध्या ९ सामन्यात दहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स हा संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. दिल्लीचे नऊ सामन्यात १४ गुण असून हा संघ भलताच फॉर्ममध्ये आहे. गब्बर शिखर धवने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात आयपीएल मधलं आपलं पहिलं शतक झळकावले असून तो सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. याशिवाय पर्पल कॅप रबाडा तर आग ओकताना दिसतो आहे.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात विकेट किपर ऋषभ पंतचे पुनरागमन झाले असून डावखूरा फलंदाज शिमरन हेटमायर देखील आज खेळताना दिसणार आहे.
पंजाबच्या दृष्टीने या सामन्याला खूप महत्त्व असले तरी त्यांचा मिडल ऑर्डर सामना फिनिश करण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. अपयशी ठरलेला मिडल ऑर्डर या सामन्यात चांगली कामगिरी करेल अशी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम