Viral video: गोरक्षकच बनले गोभक्षक; शेतकऱ्याला अडवून म्हशी विकल्या 11 लाखाला, पाहा व्हिडीओ..
Viral video: सध्या महाराष्ट्रासह देशभरात तथाकथित गोरक्षक नावाचा पथक गोंधळ घालताना पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर, ही पथके अस्तित्वात येऊन अधिक सक्रिय झाली आहेत. खरंतर गोरक्षक हे सगळं ढोंग असून, शेतकऱ्याकडून केवळ पैसे लुटण्याचा मार्ग या लोकांनी अवलंबला आहे.
गोरक्षक हे सगळं ढोंग आहे. कारण भारत देश 2014 ते 2025 या दहा वर्षात बीप एक्सपोर्ट करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. याचा अर्थ भारतात मोठ्या प्रमाणात गाईची कत्तल होते, हे उघड आहे. याशिवाय बीप एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून देखील भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात चंदा देखील घेतला आहे.
भारत गाईचे मांस एक्सपोर्ट करणाऱ्या यादीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आला असेल, तर याचा अर्थ भारतामध्ये कत्तलखान्याला परवानगी आहे. एकीकडे जर भारतात कत्तलखान्यांना परवानगी आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात गाईचे मांस देखील एक्स्पोर्ट केला जात आहे. मग शेतकऱ्यांना गाई विकण्यास का बंदी आहे, हाही मोठा प्रश्न आहे.
कायद्यामध्ये गोरक्षक अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. तरी देखील तथाकथित गोरक्षकाकांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होताना पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना साताऱ्यातील कोरेगाव या ठिकाणी घडली आहे. साताऱ्यातील कोरेगाव येथील रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्याची गोरक्षकाकडून मोठी लूट करण्यात आली आहे.
कोरेगाव येथील शेतकरी कल्याण बाजारावर आपल्या म्हशी विकण्यासाठी घेऊन जात होते. कल्याण बाजारावर जात असताना स्वतःला गोरक्षक म्हणून घेणाऱ्या काही तरुणांनी त्यांच्या म्हशी हिसकावून घेतल्या. दीड ते पावणे दोन लाख रुपये एका म्हैसची किंमत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अशा प्रकारे माझी अकरा लाख रुपयांची लूट झाल्याचं सांगताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत.
https://www.instagram.com/reel/DPBLgjQCDkp/?igsh=MTB6MW1iMTZ0ODU3eQ==
कोल्हापूर पॉलिटिक्स instagram पेज वरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत असून, शेतकरी हतबल झाले आहेत. त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू होत वाहत असून, आमच्यावर भिक मागायची वेळ येईल, असंही त्या म्हणताना या व्हिडिओत दिसत आहे.
हे देखील वाचा TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात महत्वाचा निर्णय; विद्यार्थ्यांना मिळणार..
Rohit Sharma Sack: रोहितला कर्णधार पदावरून हटवलं, संघातूनही मिळणार डच्चू; असा आहे BCCI चा रोड मॅप..
iPhone: iPhone खरंच स्मार्टफोनचा राजा आहे? जाणून घ्या कॅमेऱ्यासाठी सगळ्यात बेस्ट फोन..
Maharashtra serveyor recruitment: 903 पदांसाठी या विभागात मोठी भरती; कालपासून अर्ज भरायला सुरुवात..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम