iPhone: iPhone खरंच स्मार्टफोनचा राजा आहे? जाणून घ्या कॅमेऱ्यासाठी सगळ्यात बेस्ट फोन…
iPhone : आपल्याकडे देखील दमदार कॅमेरा फोन असावा, असं अनेकांना वाटत असतं. मात्र अनेकांना कोणता स्मार्टफोन (smartphone) खरेदी करायचा याविषयी पुरेशी माहिती मिळत नाही. जर तुम्ही देखील या चक्रव्यूहात अडकला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
अलीकडच्या काळात आयफोन खरेदी करण्याचं तरुणाईला वेड लागलं आहे. ही तरुणाई त्याचा वापर देखील मोठ्या प्रमाणात करते. अनेक जण ब्लॉगिंगसाठी स्मार्टफोनचा वापर करत असतात. मात्र जे नवीन ब्लॉगिंग सुरू करण्याच्या विचारात आहेत, किंवा ज्यांना आयफोन खरेदी कराव की नाही? आणखी कोणता फोन खरेदी करावा? या विचाराने जखडले असेल, तर तुमची यातून सुटका होणार आहे. आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत, खरंच आयफोन हा स्मार्टफोनचा राजा आहे..
ऑफरमध्ये आयफोन खरेदी करण्यासाठ इथे क्लिक करा…
आयफोन हा स्मार्टफोनचा राजा आहे. हे अगदी खरं आहे. आयफोनच्या कॅमेरा कॉलिटीला आत्तापर्यंत एकाही स्मार्टफोन कंपनीला टच करणे शक्य झाले नाही. कॅमेरा कॉलिटीमध्ये आयफोन खूप पुढे आहे. एकीकडे वीस पंचवीस हजार रुपयांत मिळणाऱ्या स्मार्टफोनला 100 मेगापिक्सल कॅमेरा असतो, 120Hz रिफ्रेश रेटही मिळतो.
या तुलनेत मात्र आयफोन केवळ 60Hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. परंतु जर दोन्ही फोनच्या स्क्रीन वापराविषयी सांगायचे झाल्यास, स्क्रोलिंग स्मुथनेस तुम्हाला आयफोनचीच सर्वोत्तम वाटते. त्यामुळे केवळ तुम्ही फीचर्सकडे न पाहता, दिलेले फीचर्स कशा पद्धतीने काम करतात, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे.
लो लाईटमध्ये आयफोन जबरदस्त कॉलिटीचे व्हिडिओ प्रदान करतो. या तुलनेत इतर कोणत्याही कंपनीचे स्मार्टफोन तुम्हाला लो लाईटमध्ये चांगला परफॉर्मन्स देणार नाहीत. इतर कोणत्याही कंपनीचे स्मार्टफोन हळूहळू स्लो होऊ लागतात. आयफोनमधे मात्र ही समस्या अजिबात जाणवत नाही.
इतर कोणत्याही स्मार्टफोन कंपनीच्या तुलनेत आयफोन प्रचंड मजबूत फोन आहे. दुसरीकडे इतर कंपन्यांचा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर एक दोन वर्षांमध्ये, स्लो चालायला लागतो. याशिवाय तो पडल्यानंतर अनेकदा डॅमेज देखील होण्याची खूप शक्यता असते. आयफोनला ही समस्या अजिबात जाणवत नाही. आयफोन अनेकदा पडला तरीही बऱ्याचदा त्याला काहीच होत नाही.
हे देखील वाचा TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात महत्वाचा निर्णय; विद्यार्थ्यांना मिळणार..
Maharashtra serveyor recruitment: 903 पदांसाठी या विभागात मोठी भरती; कालपासून अर्ज भरायला सुरुवात..
Haval H 9 SUV: अभिषेकला मिळालेली गाडी आहे जगात भारी; गाडीचे फिचर्स जाणून व्हाल चकित..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम