Maharashtra serveyor recruitment: 903 पदांसाठी या विभागात मोठी भरती; कालपासून अर्ज भरायला सुरुवात..

0

Maharashtra serveyor recruitment: सध्या देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. अनेक विभागात नोकरीची संधी उपलब्ध नाही. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरीच्या संध्या उपलब्ध नसल्याने, प्रत्येक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार अर्ज करताना दिसून येतात. परंतु अनेकांना धावपळीमुळे कुठे आणि कोणत्या विभागात नोकरीचे संधी निर्माण झाली आहे, याची माहिती मिळत नाही. जाणून घेऊया सविस्तर..

भूमी अभिलेख विभागामध्ये भूकरमापक या पदासाठी तब्बल 903 रिक्त पदांकरिता भरती केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या भरतीसाठी कालपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून, उमेदवारांना 24 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. जाणून घेऊया भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती..

महाराष्ट्रमध्ये एकूण 1160 भूकरमापक पदे रिक्त आहेत. यामधील एकूण 903 रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही सगळी पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. पुणे विभागातील एकूण 83 रिक्त पदे, कोकण विभागामध्ये 259 रिक्त पदे, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 210 रिक्त पदे, अमरावती विभागामध्ये 117 रिक्त पदे, नाशिक विभागामध्ये 124 रिक्त पदे अशी एकूण 903 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

असा करा अर्ज..

भूकरमापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या या पदासाठी उमेदवारांना 1 ऑक्टोंबर पासून 24 ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या क्रोमवर जाऊन https://mahabhumi.gov.in/mahabhumilink असे सर्च करायचे आहे. त्यानंतर संबंधित विभागाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला अर्ज भरण्यासंदर्भातील प्रक्रिया माहित होईल. अर्ज आणि पत्र उमेदवारांची परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबरला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

पात्रता

भूकरमापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांची पात्रता खालीलप्रमाणे..

कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून उमेदवाराने स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. सोबतच मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेकडून डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.

अशी होणार निवड

14 आणि 15 नोव्हेंबरला घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गुण यादी विभागनिहाय यादी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात येईल. सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या आधारावर पुढच्या परीक्षेसाठी पात्रता यादी लावण्यात येईल. आणि त्यानंतर अंतिम परीक्षा घेतली जाणार आणल्याचं, जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख विभागाने म्हटले आहे.

हे देखील वाचा Haval H 9 SUV: अभिषेकला मिळालेली गाडी आहे जगात भारी; गाडीचे फिचर्स जाणून व्हाल चकित..

Peek Pahani : शेतकऱ्याच्या मदतीला सरकार धावलं; पिक पाहणी विषयी सरकारचा मोठा निर्णय..

Peek Pahani : शेतकऱ्याच्या मदतीला सरकार धावलं; पिक पाहणी विषयी सरकारचा मोठा निर्णय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.