100rs coin RSS: भारतीय चलनावर RSS ची एन्टी; नरेंद्र मोदींनी लाँच केले 100 रुपयांचे हे नाणे…

0

100rs coin RSS : भारताच्या चलनात असलेल्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा फोटो वापरण्यात येत आहे. मात्र काल राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाला 100 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी शंभर रुपयाचे नाणे जारी केले असून, या नाण्यावर आरएसएसचा संबंध जोडला गेला आहे. भारतीय चलनात प्रथमच आरएसएसचा थेट संबंध आल्याने आता याची जोरदार चर्चा देशभरात रंगली आहे.

शंभर रुपयाच्या नाण्याबरोबर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकीट देखील जारी केले आहे. आतापर्यंत भारताच्या चलनात 50 पैशांपासून ते 20 रुपयांपर्यंतची नाणी अस्तित्वात होती. आता यात भर पडून शंभर रुपयाचे देखील नाणे चलनात आले आहे. जाणून घेऊया नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या शंभर रुपयाच्या नाण्यात नक्की काय काय आहे.

अनेकांना हे माहीत नसेल, मात्र अजूनही 50 पैसे भारतीय चलनात अस्तित्वात आहेत. व्यवहारामध्ये 50 पैसे चलन पाहायला मिळत नसले, तरी अजूनही अधिकृतरित्या ते अवैध ठरवण्यात आलेले नाही. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या शंभर रुपयाच्या नाण्यावर भारत मातेची प्रतिमा आहे. सोबतच भारत मातेच्या शेजारी राष्टीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील दाखविण्यात आलेले आहेत.

शंभर रुपयाच्या नाण्यावर भारतमाते बरोबर स्वयंसेवक संघाचे चिन्ह दाखवण्यात आलेलं आहे. या नाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के 100 वर्ष असं लिहिण्यात आलेलं आहे. काल दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्धापन दिनाला शंभर वर्षे पूर्ण झाली. याचेच औचित्य साधून शंभर रुपयाचे नाणे भारतीय चलनात जारी करण्यात आले. हा सोहळा काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये पार पडला.

शंभर रुपयाच्या नाण्यावर एका बाजूला भारत माता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिन्ह तर दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभ दाखवण्यात आला आहे. सोबतच या नाण्यावर राष्ट्रीय स्वयंम संघाचे ब्रीदवाक्य देखील छापण्यात आले आहे. आरएसएसच्या समर्पणाची भावना जागृत करण्याचा हा उद्देश असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र यावरून आता राजकीय वातावरण देखील तापले आहे. संघाचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कुठलाही संबंध नसताना, त्यांना देण्यात येत असलेले महत्त्व निरर्थक असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा Haval H 9 SUV: अभिषेकला मिळालेली गाडी आहे जगात भारी; गाडीचे फिचर्स जाणून व्हाल चकित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.