Haval H 9 SUV: अभिषेकला मिळालेली गाडी आहे जगात भारी; गाडीचे फिचर्स जाणून व्हाल चकित..
Haval H 9 SUV: नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारतीय संघाने (indian cricket team) पाकिस्तानचा (pakistan ) तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव करत नवव्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात (Asia cup final) प्रेक्षकांना चित्तथरारक लढत पाहायला मिळाली. तिलक वर्माच्या झुंजार खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला. तिलक वर्मालने फायनल सामन्यात विजय मिळवून दिला असला तरी संपूर्ण मालिकेत दमदार खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या अभिषेक शर्माची (Abhishek Sharma) मात्र जोरदार चर्चा करताना पाहायला मिळत आहे. त्याचं कारणही तसंच आहे.
आशिया चषक स्पर्धेत अभिषेक शर्माने सर्वाधिक 314 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला. बक्षीस म्हणून त्याला देण्यात आलेल्या चायनीज (china company) कारची चर्चा सध्या जोरदार होताना पाहायला मिळत आहे. ग्रेट ऑल मोटर कंपनीने बनवलेल्या गाडीचे नाव Haval H 9 SUV असे आहे. जाणून घेऊया या गाडीचे फिचर्स..
इंजिन आणि परफॉर्मेंस : HAVAL H9 SUV दमदार गाडी असून, ही एक चायनीज कंपनीची गाडी आहे. या गाडीमध्ये तुम्हाला 2.0L टर्बोचार्ज्ड तसेच 4-सिलेंडरसह येते. सोबतच पेट्रोल इंजिनचाही तुम्ही वापर करू शकता. या गाडीचे इंजिन 380 Nm टॉर्क निर्माण करण्याचे काम करते. या गाडीचे 8-स्पीड ऑटोमॅटिक ZF ट्रान्समिशशी जोडले गेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, चायनीज कंपनीची ही गाडी बर्फावर, चिखल, कठीण रस्त्यात देखील दमदार कामगिरी करते.
फीचर्स : HAVAL H9 गाडीच्या आकाराविषयी सांगायचे झाल्यास ग्राहकांना तब्बल 4950 मिमी लांबी आणि 1976 मिमी अशी या गाडीची रुंदी असणार आहे. जी सर्वोत्तम मानली जाते. साहजिकच त्यामुळे रस्त्यावरन जात असतानाही आकर्षक फील देते. सुरक्षेच्या दृष्टीने देखील ही गाडी प्रचंड दमदार आहे.
सेफ्टी फीचर्स : कंपनीकडून या गाडीला तब्बल सहा येअर्स बॅक देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ट्रॅफिक जाम असिस्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, पार्किंगसाठी 360-डिग्री व्ह्यू असणारा कॅमेराही देण्यात आला आहे. ऑटो, इको, स्पोर्ट, सँड, स्नो, मोड तसेच 4L मोड असे अनेक तगडे फिचर्स देण्यात आले आहेत.
इंटीरियर डिझायनिंग : Haval H9 या गाडीचा बाहेरील आणि आतील भाग प्रचंड आकर्षक सुरक्षित देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला पॅनोरॅमिक सनरूफ तसेच, इलेक्ट्रिक साइडस्टेप्स, सोबतच फ्रंट आणि रीअर फॉग लॅम्पही मिळणार आहे. या गाडीला तब्बल 265/55 R19 इतकी मोठी टायर साइज देण्यात आली आहे.
मसाजाची सोय : गाडीचा आतील भाग खूपच आकर्षक आणि मजबूत आहे. HAVAL H9 SUV इंटीरियर फीचर्समध्ये तुम्हाला 14.6-इंच टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात येतो. सोबतच 10-स्पीकर साउंड सिस्टम मिळते. वायरलेस चार्जर देखील देण्यात येतो. या गाडीमध्ये ड्रायव्हरच्या आरामदायीसाठी लेदर मेमरी सीट्स वापरण्यात आले आहे. सोबतच व्हेंटिलेशन सीट असणार आहे. जे ऑटोमॅटिक मसाज करण्याचे काम करणार आहे.
मॅन्युफॅक्चरिंग आणि किंमत: HAVAL H9 SUV ही गाडी ग्रेट वॉल या चायनीज कंपनीने बनवलेली आहे. या गाडीची किंमत भारतीय रुपयानुसार 34 लाख रुपये आहे. ही गाडी मार्केटमध्ये 2013 पासून अस्तित्वात असून, जगभरात या कंपनीने आपला स्वतंत्र बँड तयार केला आहे.
हे देखील वाचा Abhishek Sharma Tanya Singh : गर्लफ्रेंड आत्महत्या प्रकरणात अभिषेक शर्मा अडचणीत; त्या संबंधामुळे पोलिसांनी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम