नऱ्हेगांवचे माजी उपसरपंच अक्षय इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५५१ जणांनी केले रक्तदान
नऱ्हेगावचे माजी उपसरपंच अक्षय इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त कुणाल इंगळे मित्रपरिवाराच्यावतीने २७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 551 जणांनी सहभाग घेतला होता. तसेच अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास हजारो तरुणांनी हजेरी लावली होती. अक्षय इंगळे हे <span;>भाजप आमदार भीमराव तापकीर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. या शिबिरात सामील होण्यासाठी परराज्यातील काही तरुण आवर्जून आल्याचे पहायला मिळाले. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण शुभेच्छा देण्यासाठी व रक्तदानासाठी आले होते.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट देण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा PMRDA चे संचालक रमेश बापू कोंडे, भाजप नेते सागर भूमकर यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.
वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुणांनी हजेरी लावली होती. नऱ्हेगाव येथे शिक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी येत असतात. मनमोकळे आणि निस्वार्थ स्वभाव असणारे अक्षय इंगळे हे या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीला धावून जातात. या ठिकाणाहून शिक्षण घेऊन गेलेले काही तरुण अक्षय इंगळे यांच्याबद्दल भावना व्यक्त करत असताना भावनिक झालेले पाहायला मिळाले. अक्षय इंगळे हे ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण या तत्वावर चालणारे नेते म्हणून ओळखले जातात.
अक्षय इंगळे हे राजकारणासह एक यशस्वी उद्योजक देखील आहेत. इंगळे परिवाराचे नऱ्हेगाव, कात्रज भागात अनेक उद्योग आहेत. नऱ्हेगाव येथे त्यांचे पी. जी होस्टल्स देखील आहेत. या ठिकाणच्या अनेक तरुणांना व्यसनातून बाहेर काढल्याचे काही तरुणांनी सांगितले.
व्हॉट्सॲप ग्रुप लिंक:
https://chat.whatsapp.com/GVQNf2AntYq5cjV4DsphwR
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम