Credit Card Scam: जर तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड (Debit Card) वापरत असाल तर ही माहिती नक्की वाचा
Credit Card आणि Debit Card वापरत असताना वापरकर्त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याकडून घडलेल्या काही चुका खूप मोठं नुकसान करू शकतात. सायबर ' गु ' न्हेगार वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून Credit Card Scam करत आहेत.
Credit Card Scam– बहुतांश लोक डेबिट कार्डचा (Debit Card) वापर करत आहेत, ज्याला सर्वसामान्य लोक एटीएम कार्ड (ATM Card) म्हणून संबोधतात. त्याचप्रमाणे सध्या क्रेडिट कार्ड (Credit Card) मिळणे देखील फारसे अवघड नाही. परंतु या दोन्हींच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार (Credit Card Scam) देखील वाढत चालले आहेत. आपल्याला ज्यावेळी क्रेडिट कार्ड मिळते, त्यावेळी काही गोष्टी आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. क्रेडिट कार्ड खरेदी केल्यानंतर आपल्याकडे बँकांनी ठरवून दिलेली रक्कम काढण्याचा अधिकार असतो. अर्थात आपल्याकडे पैसे नसल्यास देखील आपण रक्कम काढू शकतो.
सध्या फसवणूक करणारे सायबर गुन्हे’गार ज्या लोकांचे क्रेडिट कार्ड आहे, त्या वापरकर्त्यांना कॉल करून त्यांना विविध सेवांची नावे घेऊन आपल्या खात्यातून आता एवढी रक्कम वजा होणार आहे, असे सांगतात. ही सेवा तुम्ही स्वतःहून चालू केली आहे का, की चुकून चालू झाली आहे? या सेवेसाठी ठराविक रक्कम खात्यातून वजा होणार असल्याचे सांगतात. जर ही सेवा तुम्हाला नको असेल तर तुमच्या व्हाट्सअप अकाउंट वरती मेसेज आला आहे तो पहा, असे सांगतात. काही केसेसमध्ये तुमच्याकडे आत्ता फक्त पाच मिनिट असल्याचे देखील सांगितले जाते. (Credit Card Scam)
हे सायबर ‘गु’न्हेगार वापरकर्त्यांना व्हाट्सॲपवर मेसेज करून लिंक पाठवतात किंवा पीडीएफ फाईल पाठवतात. परंतु मित्रांनो अशा फाईल तुम्ही डाऊनलोड केल्यामुळे तुमचा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो. तसेच वापरकर्त्यांना खात्री होण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या ई-मेल ऍड्रेस वर मेल करून हे गु’न्हे’गार लिंक किंवा पीडीएफ फाईल पाठवतात. हुबेहूब बँक किंवा क्रेडिट कार्डच्या नावाप्रमाणे हे सायबर गु’न्हे’गार ई-मेल खाते तयार करून घेतात व त्यावरून ई-मेल पाठवतात. या गोष्टी ते करत असताना एखाद्या चाणाक्ष हुशार माणसाला देखील गोंधळून सोडतात. त्यामुळे खरंच आपल्या अकाउंट वरून आता रक्कम वजा होणार आहे की काय? अशी भीती क्रेडिट कार्ड-डेबिट कार्ड वापरकर्त्याच्या मनामध्ये निर्माण होते. (credit Card Scam)
त्यामुळे असे कॉल आल्यानंतर कृपया सावधगिरी बाळगा. कारण तुमची एक चूक तुम्हाला लाखोंचं नुकसान करून देईल. त्यामुळे जर तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही अधिकृत क्रमांकावर कॉल करून तुमच्या शंकेचे निरसन करू शकता. तसेच संबंधित बँकेत जाऊन देखील याबाबत माहिती घ्या.
तुम्हाला हे माहिती आहे का?
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि तुम्हाला आंतरराष्ट्रीय पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला पासवर्डची गरज भासत नाही. तुमचा क्रेडिट कार्ड नंबर, एक्सपायरी डेट आणि तीन अंकी असणारा सीव्हीव्ही (CVV) नंबर टाकल्यास त्यावरून पासवर्ड न टाकता देखील आंतरराष्ट्रीय पेमेंट होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे असणारे क्रेडिट कार्ड हे खूप जपून वापरणे गरजेचे आहे. यामध्ये CVV नंबर महत्वाची भूमिका बजावतो. आंतरराष्ट्रीय पेमेंट तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या ॲप मधून देखील बंद करू शकता, जेणेकरून तुमच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर होणार नाही.
आपल्याला विनंती आहे, ही माहिती (लिंक) तुम्हाला शक्य असेल त्यांना पाठवा कारण हा फसवणुकीचा नवीन प्रकार अनेकांना बळी ठरवत आहे. त्यामुळे किमान आपल्या प्रियजनांना तरी ही माहिती पाठवा आणि त्यांचे आर्थिक नुकसान थांबवा. अशीच महत्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.
https://chat.whatsapp.com/FnMZxARKqN00LX2z08a8zx
हेही वाचा Virat Kohli : त्या कारणामुळे एअरपोर्टवर विराट कोहलीने महिलेला जोरदार फटकारले; व्हिडिओ तुफान व्हायरल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम