IND vs BAN: गिल, सिराजसह या दोन दिग्गजांना T20 मधून डच्चू; गंभीरचा नवा प्लॅन समोर..

0

IND vs BAN: नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत (india vs sri Lanka series) भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने ट्वेंटी मालिका जिंकली असली तरी संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला एकही सामना जिंकता आला नाही. (India lost odi series against Sri Lanka) श्रीलंका संघाने २-० या फरकाने भारतीय संघाला पराभवाची धूळ चारत नवा इतिहास रचला.

गौतम गंभीच्या (Gautam Gambhir) नेतृत्वाखाली भारतीय संघाची पहिलीच मालिका होती. मात्र अपेक्षाप्रमाणे गौतम गंभीरला प्रशिक्षक म्हणून कामगिरी करता न आल्याने आता गंभीरवर सर्व स्तरातून टीका होत आहे. श्रीलंकेच्या मालिकेनंतर भारतीय संघाला बांगलादेशाविरुद्ध दोन कसोटी आणि 3 t20 सामन्याची मालिका खेळायची आहे. टी ट्वेंटी मालिकेसाठी आता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यात अनेक आश्चर्यकारक बदल करण्यात आले आहेत.

भारत आणि बांगलादेश (ind vs BAN) यांच्यामध्ये 7 ऑक्टोंबर पासून टी-ट्वेंटी मालिकेला सुरुवात होत आहे. टी ट्वेंटी मालिकेत भारतीय संघामध्ये अनेक मोठे बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अद्यापतरी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृतरित्या घोषणा झाली नाही. मात्र कोच गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (ajit agarkar) यांच्यामध्ये संघ निवडी विषयी चर्चा झाल्याची माहिती समजते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार t20 संघाचा उपकर्णधार शुभमन गिलला (shubman gill) भारतीय भारताच्या t20 संघात संधी दिली जाणार नसल्याची माहिती आहे. शुभमन गिल बरोबर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) संजू सॅमसन (sanju Samson) शिवम दुबे (shivam Dube) खलिल अहमद (Khaleel Ahmed) यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची माहिती आहे. श्रीलंके विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये अपयशी ठरल्याने पाचही जणांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाच जणांच्या जागेवर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) तिलक वर्मा (tilak Varma) हर्षित राणा (harshit Rana) तुषार देशपांडे (tushar deshpande) आणि अभिषेक शर्मा (abhishek Sharma) यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. विकेट किपर म्हणून ध्रुव जुरेलला देखील संधी दिली जाऊ शकते, अशी माहिती आहे.

हे देखील वाचा Vidhansabha 2024: माळशिरसची जबाबदारी मोहिते पाटलांवर; सातपुते, जाणकरांचा होणार पद्धतशीर कार्यक्रम..?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.