Hardik Pandya vs MI : तुम्ही काय काढणार, मलाच नको कर्णधारपद; ‘त्या’ कारणामुळे हार्दिक पांड्याचा संताप..
Hardik Pandya vs MI : गेल्या काही सिझनमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) अपयशी ठरल्यानंतर, मुंबई इंडियन्सने रोहित ऐवजी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार केले. तब्बल पाच वेळा आयपीएल (IPL) स्पर्धा जिंकून देणाऱ्या कर्णधाराला अचानक कर्णधार पदावरून काढून टाकल्याने, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) घेतलेल्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अगदी मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंनी देखील अप्रत्यक्ष आपली नाराजी बोलून दाखवली.
गेल्या तीन चार सिझनमध्ये मुंबई इंडियन्स संघाला चमकदार कामगिरी करता न आल्याने, रोहित ऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता मात्र हा निर्णय चुकीचा ठरल्याची जाणीव मुंबई इंडियन्सला झाल्याने, आता पुन्हा एकदा कर्णधार पदावरून मुंबई इंडियन्सने यूटर्न घेतला आहे.
रोहित शर्माकडे (Rohit Sharma) पुन्हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची धुरा देण्यात येणार आहे. या संदर्भात हार्दिक पांड्या सोबत चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. एकीकडे अशी चर्चा असली तरी दुसरीकडे हार्दिक पांड्याही मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करण्यासाठी इच्छुक नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई इंडियन्स संघातील सिनियर खेळाडू आपल्या सल्ल्याकडे फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे कारण हार्दिक पांड्यानेही टीम मॅनेजमेंटला दिले आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू इच्छुक नसल्याची माहिती आहे. याशिवाय हार्दिक पांड्याला नेतृत्व करण्यासाठी पुरेसा वाव देखील मिळत नाही. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंना वेगळे मार्गदर्शन करत असल्याने, आपण आखत असलेली रणनीती अपयशी ठरत असल्याची तक्रारही हार्दिक पांड्याने टीम मॅनेजमेंटकडे केली असल्याची माहिती आहे.
याशिवाय चाहत्यांची देखील मोठी नाराजी आपल्यावर ओढवून घेतली जात आहे. ही बाब देखील हार्दिक पांड्याच्या लक्षात आल्यानंतर, आता हार्दिक पांड्याने देखील मुंबई इंडियन्स संघात पुढचे दोन सीजन ऑल राऊंडरच्या भूमिकेत खेळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. दोन सीजन आता हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व देण्यात येणार असल्याची माहिती आहे. पुढचे दोन सीजन हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा MI captain Rohit Sharma : मुंबई इंडियन्स कडून हार्दिक पांड्याला गेट आउट; रोहित शर्मा पुन्हा कर्णधार..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम