MI captain Rohit Sharma : मुंबई इंडियन्स कडून हार्दिक पांड्याला गेट आउट; रोहित शर्मा पुन्हा कर्णधार..
MI captain Rohit Sharma : आयपीएल (ipl) 2017 चा हंगाम सुरू झाला आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाचे एक-दोन सामने झाले असले तरी या स्पर्धेत अनेक उलटफेअर पाहायला मिळाले आहेत. काल सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा (sunrisers Hyderabad beat Mumbai Indians) ऐतिहासिक पराभव करत, या हंगामात आपण विजयाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सगळ्यात मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम देखील हैद्राबाद आपल्या नावावर केला.
एकीकडे हैद्राबाद संघाने विक्रम केला असला तरी दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाच्या (mumbai Indians) झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे आता हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कर्णधार पदावर देखील टांगती तलवार आली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाला लगातार दोन पराभव पहावे लागले. खेळात जय-पराजय या नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कर्णधार म्हणून प्रचंड साधारण वाटला. ज्याचाच फटका आता त्याला भसला आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने तब्बल पाच वेळा आयपीएल ट्रॉफी (IPL trophy) जिंकण्याचा कारनामा केला. मात्र गेल्या काही सिझन पासून रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून सपशेल अपयशी ठरला. साहजिकच या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याची मुंबईच्या मालकांनी कर्णधार पदावर वरून हकालपट्टी केली. आणि रोहित ऐवजी हार्दिक पांद्याची कर्णधार पदावर नियुक्ती केली.
रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला त्याच्या जागी कर्णधार करण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सने घेतला. मात्र आता केवळ दोनच सामन्यानंतर मुंबई इंडियन्स आणि टीम मॅनेजमेंट यांना या निर्णयाचा पश्चाताप होताना पाहायला मिळत आहे. होय हार्दिक पांड्याची कर्णधार पदावरून हकालपट्टी करून पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
रोहित शर्मा आणि आकाश अंबानी (akash Ambani) यांच्या सोबत याविषयी चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. इतकच नाही, तर हार्दिक पांड्यासोबत देखील यासंदर्भात सुचित करण्यात आल्याची माहिती आहे. हार्दिक पांड्या सोबत या संदर्भात काही मुद्द्यांविषयी चर्चा देखील झाली आहे. एकीकडे हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून साधारण वाटत असला तरी दुसरीकडे फलंदाज आणि गोलंदाज म्हणून देखील हार्दिक पांड्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही. हे देखील कर्णधार पदाच्या बदलीचे मुख्य कारण आहे.
मात्र हार्दिक पांद्याला संघातील खेळाडू कडूनच अंतर्गत विरोध होत आहे. संघातील अनेक बडे खेळाडू हार्दिक पांद्याच्या नेतृत्वात खेळण्यास अनुकूल नसल्याची माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघातील सिनियर खेळाडूंना मार्गदर्शन, गेम प्लॅन विषयी चर्चा करताना देखील कंफर्टेबल वाटत नसल्याचं दिसून आले आहे. संघातील खेळाडू बरोबर चाहते देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. त्यामुळे चाहत्यांची नाराजी देखील दूर करण्याचा विचारात मुंबई इंडियन्स फ्रेंचाईजी आहे.
हे देखील वाचा Health tips : एक महिना आहारातून चपाती काढून टाकल्यास काय होईल? वाचून बसेल धक्का..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम