Rohit Sharma-ishan Kishan : ..म्हणून त्यांना खेळवण्यात अर्थ नाही; रोहित शर्माच्या निशाण्यावर केएल राहुल, ईशानसह हे दोन खेळाडू..
Rohit Sharma-ishan Kishanभारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध (ind vs ENG test series) सुरू असलेली पाच कसोटी सामन्याची मालिका अखेर जिंकली आहे. (India won the series by 3-1) अनेक अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीत नवीन खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीचा जोरावर भारताने मालिका जिंकण्याचा कारनामा केला. पाच कसोटी सामन्याची मालिका 3-1 अशी जिंकत इंग्लंड संघाच्या बॅसबॉलची हवी काढली. भारतीय संघाकडे आता पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना जिंकून 4-1 अशा फरकाने मालिका जिंकण्याचीही संधी देखील आहे.
वैयक्तिक कारणामुळे विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली. विराट कोहली शिवाय दुखापतीमुळे केएल राहुल (kl Rahul) देखील पहिल्या सामन्यानंतर उर्वरित तीन सामने खेळू शकला नाही. इतकंच नाही, तर जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) देखील चौथा कसोटी सामना खेळू शकला नाही. ध्रुव जुरेल (Dhruv jurel) सरफराज खान (Sarfaraz Khan) आकाश दीप (akash deep) रजत पाटीदार (rajat Patidar) अशा चार खेळाडूंचे या मालिकेत पदार्पण झाले. मात्र तरी देखील रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वात इंग्लंड संघाला पराभूत करण्यात भारतीय संघाला यश आले. साहजिकच यामुळे रोहित शर्मा आणि नवीन खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.
एकीकडे मालिका विजयामुळे भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत असतानाच, दुसरीकडे रोहित शर्माने केलेल्या पत्रकार परिषदेत केले विधानाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. विजयानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने अनेक विषयांवर भाष्य केलं. नवीन खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर आम्ही इंग्लंडला पराभूत करू शकलो. नवीन खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत दमदार कामगिरी केली.
कसोटी क्रिकेट हे खूप आव्हानात्मक आहे. कोणाला खेळायचं आहे, कोणाला नाही, हे खेळाडूंच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते. ज्या खेळाडूंना भूक नाही, त्यांना खेळवून काहीही उपयोग नाही. ज्यांना भूक आहे, त्यांनाच आम्ही संधी देत आहोत. ज्यांना भूक नाही, त्यांना खेळवून काहीही उपयोग नाही. रोहित शर्माने केलेल्या विधानामध्ये कोणाचे नाव घेतलं नसलं तरी रोहित शर्माचा रोख कोणाकडे होता, आहे आता लपून राहिले नाही.
बीसीसीआयने (BCCI) विनंती करून देखील श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ईशान किशनने (ishan Kishan) खेळण्यासाठी नकार दिला. केएल राहुलने देखील खेळला फारसे गांभीर्याने घेत नसल्याचं सातत्याने पाहायला मिळाले आहे. श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोघांनी रणजी ट्रॉफी खेळण्यास स्पष्ट नकार दिला. साहजिकच त्यामुळे रोहित शर्माने या खेळाडूंना टार्गेट केले. जय शहा यांच्यानंतर रोहित शर्माने देखील ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या यांना आव्हान दिल्याने, आता या दोघांचे कमबॅक आणखी लांबणीवर पडल्याचे बोलले जातं आहे.
हे देखील वाचा Ishan Kishan Shreyas Iyer : BCCI ने श्रेयस अय्यर ईशान, किशनला करारातून वगळले; एक वर्ष संधीही नाही, निर्णयाची अंमलबजावणी बाकी..
Soap for face : तुम्ही देखील चेहऱ्याला साबण लावता? मग हे वाचा आणि तुम्हीच ठरवा काय ते..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम