लॉकी फर्ग्युसनने केली हैदराबादची बिर्याणी; कोलकत्ता जितबो रे!

0

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल 2020चा 35 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यामध्ये अबुधाबी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला.

कोलकत्ता नाइट रायडर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॉर्गन आणि दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकत्ताने १६३ धावांपर्यंत मजल मारली. आंद्रे रसेलने पुन्हा एकदा निराशा केली. त्याला ११ चेंडूत केवळ९ धावा करता आल्या. कार्तिकने १४ चेंडूत नाबाद २९ तर मॉर्गनने २३ चेंडूत ३४ धावा केल्या.

१६४धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली. ६.१ षटकात संघाच्या ५७ धावा असताना केन विल्यमसन एकोणीस चेंडूत २९ धावा करून बाद झाला. परंतु पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादच्या मिडल ऑर्डरने निराशा केली.

सनरायझर्स हैदराबादने नियमित सलामीवीर वॉर्नरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीलासाठी पाठवले. वॉर्नरनेही कर्णधाराला साजेशी खेळी करत नाबाद ३३ चेंडू ४७ धावा केल्या. परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. आंद्रे रसलने टाकलेल्या शेवटच्या षटकात वॉर्नने सलग तीन चौकार खेचले. शेवटच्या चेंडूत दोन धावांची आवश्यकता होती परंतु वॉर्नरला एकच धाव करता आली.

एका चेंडूत दोन दावा न करता आल्याने हा सामना बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. या आयपीएलमधील ही तिसरी सुपर ओव्हर ठरली.

कोलकत्ताकडून या सीजनमधला लॉकी फर्गुसनचा हा पहिलाच सामना होता. सुपर ओव्हर टाकण्यापूर्वी त्याने सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंचे अक्षरशः कंबरडे मोडून काढले. लॉकी फर्ग्युसने ४ षटकात १५ धावा देत सनरायझर्सच्या महत्त्वाच्या तीन खेळाडूंना तंबूत पाठवले.

सुपर ओव्हरमध्ये देखील त्याने हाच फॉर्म दाखवला. त्याने ३ चेंडूत २ धावा देत दोन्ही फलंदाजांना बात करत हा सामना कोलकत्याच्या बाजूने झुकवला.

सुपर ऑफरमध्ये कोलकात्याला विजयासाठी तीन धावांची आवश्यकता होती. मॉर्गन आणि कार्तिकने ही औपचारिकता पूर्ण केली. कोलकात्याचा या सिझन मधला ९ सामन्यातला हा पाचवा होता. दहा गुणांसह कोलकत्ता आता चौथ्या क्रमांकावर आहे.

कोलकत्ता संघाने मिळवलेल्या या विजया बरोबर त्यांनी या स्पर्धेमधील चौथा क्रमांकासाठीची दावेदारी आणखी भक्कम केली. कोलकत्ता नाइट रायडर्स संघाला प्ले ऑफ खेळण्यासाठी आता पाच सामन्यात दोन विजयाची गरज आहे.

टेक्निकली कोणताही संघ या स्पर्धेतून बाहेर गेला नसला तरी, कोलकत्याच्या विजया बरोबर, चेन्नई सुपर किंग,राजस्थान रॉयल,सनरायझर्स हैदराबाद, आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघांच्या प्ले ऑफ खेळण्याच्या आशा हळूहळू संपुष्टात येत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.