Mauris Noronha: अभिषेक घोसाळकर हत्त्या प्रकरणात नवा ट्विस्ट; मारेकरी दुसराच, मॉरिसला त्यानेच संपवलं..
Mauris Noronha: राज्यात दररोज नवनवीन आणि धक्कादायक घटना करताना पहिला मिळत आहेत. दोन दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (shivsena uddhav Balasaheb Thackeray) नेते अभिषेक गोसाळकर (abhishek ghosalkar) यांची हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच ही हत्या करण्यात आल्याने, देशभर या घटनेचे पडसाद उमटले. मात्र आता या घटनेने वेगळेच वळण घेतले असून, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. (Abhishek Ghosalkar Case new twist)
अभिषेक घोसाळकर हे दहिसर विभागातून मुंबई महानगरपालिकेवर दोनदा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. याच भागात मॉरिस नोरोन्हो (Mauris Noronha) हा देखील काम करत होता, अशी माहिती आहे. फेसबुक लाईव्ह दरम्यान दोघांनीही एकत्र येऊन आता आम्ही यापुढे एकत्र दहिसर विभागाचे काम करणार असल्याचे म्हटलं होतं. आम्ही एकत्र येण्याने अनेकांना आश्चर्य होईल, असे देखील दोघे म्हणत होते. मात्र अचानक मॉरीस उठवून पुढे गेल्यानंतर, अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
अभिषेक गोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला असला तरी गोळीबार नेमका कोणी केला? या संदर्भातले फुटेज पाहायला मिळाले नाही. अभिषेक गोसाळकर यांच्यावर गोळीबार मॉरिसने केला नसून, या दोघांचाही मारेकरी दुसराच असल्याचे शंका व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी देखील ही शंका उपस्थित केली आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या शस्त्राचा परवाना देखील मॉरिस यांच्या नावावर नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्या शस्त्रामधून गोळ्या झाडण्यात आल्या, त्या शस्त्राचा परवाना मॉरिसचा बॉडीगार्ड असणाऱ्या मिश्रा या व्यक्तीच्या परवाना धारक शस्त्रातून झाडण्यात आल्या. शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही हा मुद्दा उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांनाही संपवण्याची सुपारी कोणाला देण्यात आली होती का? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. फेसबुक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या, हे मात्र दिसत नाही.
जर दोघे फेसबुकच्या माध्यमातून एकत्र येऊन, काम करू इच्छित होते, तर मग मॉरिसने त्याला का मारले? आणि नंतर स्वतःला गोळी मारून आत्महत्या का केली? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी या दोघांना मारण्याची कोणाला सुपारी दिली होती का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर, आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत असून, अभिषेक घोसाळकराचा बॉडीगार्ड मिश्राला पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे.
हे देखील वाचा Abhishek Ghosalkar Case: अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं धक्कादायक कारण समोर; मॉरिसने गोळ्या घालून स्वतःलाच का संपवले..
Rohit Sharma Delhi capitals captain : रोहित शर्मा दिल्ली संघाचा नवा कर्णधार; ऋषभ पंत या भूमिकेत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम