IND vs ENG 2nd test: दुसऱ्या कसोटीतून जडेजा, राहुल बाहेर, शुभमन गिललाही डच्चू; हे तीन खेळाडू करणार डेब्यू..

0

IND vs ENG 2nd test: पहिल्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात 190 धावांची आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने आश्चर्यकारक विजयाची नोंद करत इतिहास रचला. भारतीय संघ इंग्लंडला व्हाईट-वॉश देईल, असं अनेकांनी म्हंटले. मात्र इंग्लंडने पहिल्याच सामन्यात आपला बेसबॉल (baseball) खेळ दाखवून देत, भारतीय संघाला चारी मुंड्या चीत केले.

पहिल्या विजयानंतर इंग्लंड संघाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून, पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंड संघाचे वर्चस्व राहणार, असल्याचंही बोललं जात आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहलीने (Virat kohli) वैयक्तिक कारण देत माघार घेतली होती. ज्याचा फटका पहिल्या कसोटीत भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळालं. आता पुन्हा भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात दमदार फलंदाजी करणाऱ्या दोन खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) आणि केएल राहुल (kl Rahul) दोघेही दुखापतीमुळे दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाहीत. इन्फॉर्म खेळाडू बाहेर झाल्याने, भारतीय संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या दोघांच्या जागेवर सौरभ कुमार (Sourabh Kumar) सरफराज खान (Sarfaraz Khan) वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या तिघांना संधी मिळाली आहे.

रवींद्र जडेजा, केएल राहुलसह शुभमन गिल देखील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे. जडेजा आणि केएल राहुलला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. तर गेल्या अनेक सामन्यात शुभमन गिल सातत्याने अपयशी ठरल्याने, त्याला डच्चू मिळणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात तीन खेळाडूंना डेब्यू करण्याची संधी मिळणार आहे. शुभमन गिलच्या जागेवर रजत पाटीदारचे (rajat Patidar) पदार्पण होणार आहे. तर केएल राहुलच्या जागेवर सरफराज खानची निवड केली जाणार आहे.

ऑल राऊंडर रवींद्र जडेजाचा पर्याय म्हणून सौरभ कुमारला (Saurabh Kumar)भारतीय कसोटी संघात डेब्यू करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय फलंदाजीची सगळी मदार आता रोहित शर्मावर आली असून भारतासाठी दुसरी कसोटी मोठं आव्हान आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील इंग्लंड संघाने भारतीय संघ व विजय मिळवला तर भारतीय संघाला पुढे कसोटी मालिका वाचवणं खूप मोठा आव्हान असेल.

हे देखील वाचा  Indian Army Recruitment 2024: भारतीय सेनामध्ये 381 जागांसाठी मेगा भरती; कोणाला करता येणार अर्ज? वाचा सविस्तर..

Love tips: समोरून लाईन मिळते आहे, की नाही हे कसं ओळखाल? हे इशारे मिळत असतील, तर वेळ न घालवता बिंदास करा प्रपोज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.