मुंबईने कोलकत्याचा केला वडापाव!

0

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल2020 चा 32 वा सामना अबुधाबी क्रिकेट मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला.

नाणेफेक जिंकून कर्णधार मॉर्गनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकत्ताची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. कोलकत्ताने सुरुवातीच्या १०.४ षटकांत 5 बाद 61 धावा केल्या.

कर्णधार मार्ग आणि पॅट कमिन्स यांनी आणखी पडझड न होऊ देता संघाला १४८ अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. पॅट कमिन्सने सर्वाधिक ३६ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार मॉर्गने २९चेंडूत३९ चांगली साथ दिली.

१४९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या मुंबई इंडियनची सुरुवात भन्नाट झाली. रोहित शर्मा आणि डीकॉक यांनी पहिल्या विकेटसाठी १०.३ षटकात ९४ धावांची भागीदारी करत मुंबई इंडियन्सच्या विजयाचा पाया रचला.

मुंबई इंडियन्स कडून डीकॉकने सर्वाधिक ४४ चेंडूत ७८ धावांची खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. डीकॉकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

मुंबई इंडियन्स आठ सामन्यात 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध दुबई क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.