Acharya Chanakya thought: काहीही झालं तरी या दोन गोष्टी कोणालाही सांगू नका; तरच..

0

Acharya Chanakya thought: आजही आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) सांगितलेल्या नीतीचे अनेक जण पालन करतात. मनुष्याच्या जीवनाविषयी आचार्य चाणक्य यांनी व्यवस्थित लिहून ठेवलं आहे. अनेक विषयांवर भाष्य करताना आचार्य चाणक्यांनी मनुष्याच्या जीवनावर देखील सविस्तरपणे मांडणी केली आहे. ज्याचा आजही अनेकजण आपल्या जीवनात वापर करतात. आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी मनुष्याने चुकूनही कोणाला शेअर करू नका याविषयी देखील टिप्पणी केली आहे. जाणून घेऊया सविस्तर.

मनुष्याला जीवनामध्ये गाजावाजा करण्याची सवय असते. मात्र आचार्य चाणक्य सांगतात, जीवनात कधीही गाजावाजा करू नका. अनेकदा आपण आपल्या कामासंदर्भात किंवा एखाद्या ध्येयाविषयी इतरांना सांगत सुटलो. मात्र मनुष्याचा हा गुण चांगला नसू,  त्याचे परिणाम देखील भोगावे लागतात. अनेकजण नवीन कामाची सुरुवात करताना अनेकांना सांगत बसतात. मात्र तेच काम जर पूर्वत्वास गेलं नाही, तर आपल्या जवळच्या लोकांचे देखील हसू होतं. त्यामुळे तुमचे यश कोणालाही ओरडून सांगण्याची गरज नसते. ते तुमच्या कर्तुत्वामध्ये दिसत असते.

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजासोबत राहायला त्याला आवडत असतं. साहजिकच त्यामुळे त्याच्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट तो इतरांना शेअर देखील करत असतो. मात्र अनेकदा काही गोष्टी अशा असतात. ज्या कोणालाही शेअर करणे योग्य ठरत नाही. अगदी जवळच्या माणसांपासून देखील काही गोष्टी लपवून ठेवणं आवश्यक असतं. आचार्य चाणक्य देखील हेच सांगतात. मनुष्याने दोन गोष्टी कधीही कोणालाही सांगू नयेत, असं चाणक्य म्हणतात. कोणत्या आहेत, त्या गोष्टी जाणून घेऊ सविस्तर..

प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगला मित्र असतो. मात्र हा चांगला मित्र कायम आयुष्यभर तुमची सोबत देईल, राहील असं होत नाही. अनेकदा वादविवाद होतात, भांडणे होतात. साहजिकच भांडणामुळे अनेकदा तो नैतिकदृष्ट्या रसातळाला देखील जाण्याची शक्यता असते. अशा वेळेस, तुम्ही एकांतात सांगितलेली अनेक गुपिते उघड करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कितीही जवळचा मित्र असला, तरी काही गोष्टी तुम्ही लपवून ठेवणे देखील योग्य ठरतं.

आचार्य चाणक्य यांनी कामासंदर्भात देखील काही मार्गदर्शक तत्वे सांगितले आहेत. एखादे नवीन काम तुम्ही जेव्हा सुरू करायला जाता, तेव्हा तुम्ही ते काम तुमच्या जवळच्या माणसांना किंवा इतरांना सांगायलाच हवं असे अजिबात नाही. अनेकदा तुम्ही तुमच्या कामाविषयी इतरांना सांगितल्याने ते काम पूर्ण होतंच असं नाही. त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये देखील जाण्याची शक्यता असते. जेव्हा तुमचं काम यशस्वी होईल, त्यावेळेस इतरांना ते दिसत असतं. म्हणून कामाची फारशी चर्चा न करता प्रामाणिक आपलं काम करत राहायचं. यश कमी जास्त प्रमाणात मिळत राहते. असं चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा Chanakya on wife: पत्नी संतुष्ट होत नसेल तर देते हे इशारे; वेळीच ओळखा अन्यथा..

AFG vs IND 1St T20 match: T20 सिरीजमध्ये या दोन गोष्टी सुधारा, अन्यथा T20 सोडा; विराट, रोहितला BCCI कडून शेवटची संधी..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.