IND vs SA 1St test: रोहित शर्माच्या त्या गाढव चुकीमुळे भारत पहिल्या कसोटीत पराभवाच्या छायेत..
IND vs SA 1St test: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत यांच्यामध्ये पहिली कसोटी सुरू आहे. आज पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून, भारतीय संघ पराभवाच्या छायेतही आहे. राहुलच्या दमदार शतकामुळे भारताने पहिली कसोटी जिंकण्याची अशा कायम ठेवली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने केलेला दमदार फलंदाजीमुळे भारतीय संघ आता बॅकफूवरवर आहे. भारतीय संघ पूर्णपणे बॅक फूटवर असण्याला कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) जबाबदार आहे.
केएल राहुलच्या (kl Rahul) दमदार शतकामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 245 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख फलंदाजांना स्वस्तात बाद देखील केले. आफ्रिकेचे तीन फलंदाज 113 धावात बाद देखील झाले होते. त्यानंतर मात्र कॅप्टन रोहित शर्माने आपल्या गोलंदाजांचा योग्य वापर केला नाही. त्याचा परिणाम दक्षिण आफ्रिकेने या कसोटीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
खेळाच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने लंच ब्रेकनंतर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) गोलंदाजी दिली नाही. आपल्या प्रमुख गोलंदाजांना गोलंदाजी देणे ऐवजी रोहित शर्माने शार्दुल ठाकूर (shardul Thakur) आणि प्रसिद्ध कृष्णाला अधिक काळ गोलंदाजी करायला सांगितले. ब्रेकनंतर फलंदाजांना खेळपट्टीवर सावधपणे खेळ करावा लागतो. त्यामुळे या काळात रोहित शर्माने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना गोलंदाजी दिली असती, तर कदाचित दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यात या गोलंदाजांना यश मिळालं असतं.
प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी पहिला स्पेल टाकल्यानंतर जसप्रीत बुमराहकडे गोलंदाजीसाठी चेंडू देण्यात आला. जसप्रीत बुमराहने लगेचच दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज बादही केले. त्यामुळे जसप्रीत बुमराला उशिरा गोलंदाजी करण्यासाठी बोलावण्याचा घेतलेला निर्णय भारतीय संघाच्या विरोधात गेला.
रोहित शर्माच्या या निर्णयाबरोबर मैदानात भारतीय संघाच्या खेळाडूंची बॉडी लैंग्वेज फारच ढिसाळ पाहायला मिळत होती. विरोधी संघाचे फलंदाज जेव्हा मैदानात चांगला खेळ करत असतात, तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपल्या गोलंदाजांना प्रोत्साहित करणे, मैदानामध्ये एनर्जी कायम ठेवणे कर्णधार म्हणून खूप आवश्यक असतं. मात्र रोहित शर्मा यामध्ये कमी पडला. याचाही भारतीय संघाला फटका बसला.
जेव्हा विराट कोहली कर्णधार होता, त्यावेळी मैदानामध्ये कायम जोश आणि एनर्जी सामना संपेपर्यंत राहायची. मात्र रोहित शर्माच्या मार्गदर्शकाखाली टीम इंडियामध्ये हे होताना दिसत नाही. याचा पुरेपूर फायदा विरोधी संघ उठवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा Ajit pawar vs Amol kolhe: ..म्हणून अजित पवारांना फुल कॉन्फिडन्स; काय आहे शिरूर लोकसभेचे गणित? खरचं कोल्हे पडतील?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम