T20 World Cup: रोहित शर्माच्या कर्णधार पदाला आव्हान दिले; आता तोच T-20 World Cup मधून आउट..
T20 World Cup: गेल्या दहा वर्षापासून भारतीय संघाला (Indian cricket team) अद्याप एकही आयसीसी स्पर्धा (ICC trophy) जिंकता आलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकामध्ये (world Cup 2023) भारतीय संघाने लगातार 10 सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला. ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला फायनलमध्ये धूळ चारत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. वर्ल्ड कप जिंकता आला नसल्याने, खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांना देखील निराशा झाली. मात्र दुसरीकडे भारतीय संघाने केलेल्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुकही झाले.
दमदार कामगिरीनंतरही भारतीय संघाला विश्वविजेता होता आलं नाही. परंतु आता पुन्हा एकदा भारताला T-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. पुढील वर्षी वेस्टइंडीजमध्ये T-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. भारतीय संघाचे अनुभवी आणि यंग ब्रिगेड देखील दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे हा वर्ल्ड कप जिंकण्याची मोठी संधी भारताकडे आहे.
2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) T 20 संघाची सूत्रे दिली गेली. या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नसती तरी रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) केएल राहुलसह (KL Rahul) अनेक अनुभवी खेळाडूंना t20 पासून दूर ठेवले गेले. मात्र आता पुन्हा t20 विश्वचषकासाठी रोहित शर्माकडेच कर्णधार पद दिले जाणार असल्याची दाट शक्यता आहे.
विश्वचषक 2023 मध्ये गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या सध्या संघातून बाहेर आहे. हार्दिक पांद्या टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. मात्र तो दुखापत झाला, त्यांनतर आता हार्दिक पांड्या 2024 मध्ये आयपीएलच्या कोणत्याही संघाचा कर्णधार देखील नसणार आहे. एवढेच नाही, तर त्याच्या आयपीएलच्या (ipl) सहभागा विषयी देखील अद्याप स्पष्टता आलेली नाही.
हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स (mumbai Indians) कडून खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, गुजरात टायटन्स संघाने त्याला ट्रेड केले. हार्दिक पांड्या मुंबईच्या गोटात सामील झाला असला तरी कर्णधारपद रोहित शर्माकडेच असणार आहे. मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद या अटीवर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परतला. मात्र पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये तो कर्णधार पद भूषवताना दिसणार नाही.
पुढील हंगामात हार्दिक पांड्या कोणत्याही आयपीएल संघाचा कर्णधार नसणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या टी-ट्वेंटी विश्वचषक संघात देखील तो कर्णधार पद भूषवताना दिसणार नाही. एवढंच नाही, तर आयपीएलमध्ये त्याने दमदार पुनरागमन केले नाही, तर भारताच्या t20 विश्वचषक संघात त्याच्या सहभागा विषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
हे देखील वाचा Chanakya Niti on youngster: तारुण्यात करा या गोष्टी; अन्यथा म्हातारपणात भोगाल नरक यातना..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम