Birthday special; गौतम गंभीर

1

14 ऑक्टोबर 1981 साली नवी दिल्ली येथे जन्मणाऱ्या गौतम गंभीरने 11एप्रिल 2003 साली बांगलादेश विरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली. गौतम गंभीरने पुढे अनेक आंतरराष्ट्रीय कारनामे आपल्या नावावर करण्याची किमया केली.

गौतम गंभीरने 147 एकदिवसीय सामन्यांचे प्रतिनिधित्व करताना 39.68च्या सरासरीने 5,238 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतके तर 34 शतकांचा समावेश आहे. नाबाद 150 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

गौतम गंभीरने 58 कसोटी सामन्याचे प्रतिनिधीत्व करताना 41.95च्या सरासरीने 4154 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतके तर 22 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर एक द्विशतक करण्याचा कारनामा देखील गंभीरे केला आहे.

37टी ट्वेंटी सामन्यांमधून सात अर्धशतकासह गौतम गंभीरने 932 धावा केल्या आहेत.

गौतम गंभीर 2007च्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये टॉप स्कोरर होता. 2011च्या वर्ल्डकप फायनल मध्ये देखील तो टॉप स्कोरर होता. भारताला हे दोन वर्ल्ड कप मिळवून देण्यात गौतम गंभीरचा सिंहाचा वाटा राहीला आहे.

पाच कसोटी सामन्यात सलग पाच शतके करणारा गौतम गंभीर एकमेव भारतीय आहे. गौतम गंभीर हा नेहमी अग्रेसिव्ह खेळाडू म्हणून ओळखला गेला.

गौतम गंभीरने 3 डिसेंबर 2018 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली. गौतम गंभीर सध्या भाजपचा लोकसभेचा खासदार आहे.

वयाच्या 39 वर्षात पदार्पण करणाऱ्या गौतम गंभीरला महाराष्ट्र लोकशाही न्यूज पोर्टल तर्फे खूप खूप शुभेच्छा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

1 Comment
  1. Karan says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.