India Post Recruitment 2023: या उमेदवारांसाठी टपाल विभागात नोकरीची मोठी संधी; जाऊन घ्या अर्ज प्रक्रिया..
India Post Recruitment 2023: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या (government job) शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. भारतीय टपाला विभागामध्ये दहावी बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती निघाली आहे. भारतीय टपाल (India post department) विभागाकडून या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मेल गार्ड, पोस्टल असिस्टंट,पोस्टमन, मल्टी टास्किंग, स्टाफ सॉर्टिंग, असिस्टंट इत्यादी पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
भारतीय टपाल विभागाकडून जाहीर केलेल्या या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. जाणून घेऊया भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया, पात्रता, अर्ज शुल्क, आणि महत्त्वाच्या तारखा.
पदे/ रिक्त जागा/ शैक्षणिक पात्रता
सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ, पोस्टल असिस्टंट,मेल गार्ड, पोस्टमन या पदासाठी एकूण 1 हजार 899 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 19 ते 27 यादरम्यान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा/ अर्ज शुल्क
सरकारी नियमानुसार वयोमर्यादित प्रवर्गानुसार सूट दिली जाणार आहे. जर उमेदवार ओबीसी प्रवर्गातून अर्ज करणार असेल, तर 30 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे. एससी एसटी कॅटेगिरीतून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पाच वर्षाची सूट दिली जाईल. OBC आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये परीक्षा फी आकारली जाईल.
ऑनलाईन अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत दहा नोव्हेंबर पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2023 ठेवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन http://www.indiapost.gov.in/ असं सर्च करायचं आहे. त्यांनतर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. मग तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता.
पगार
भारतीय टपाल विभागाकडून निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना पदानुसार दरमहापगार मिळणार आहे. पोस्टल असिस्टंट त्याचबरोबर सॉर्टिंग असिस्टंट या पदासाठी पंचवीस हजार पाचशे एक्याऐंशी हजार शंभर रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी 18000 ते 56 हजार 900 रुपये पगार असेल. पोस्टमन आणि मेल गार्ड या पदासाठी 21 हजार 700 ते 69 हजार 100 दरमहा पगार असेल भरतीची जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम