World Cup semi final: ..का आहे न्युझीलंड भारतासाठी खतरा; जाणून घ्या सेमी-फायनलचे गणित आणि जिंकण्याची शक्यता..
World Cup semi final: विश्वचषक 2023 (world Cup 2023) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. भारत (india) दक्षिण आफ्रिका (South Africa) ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New zealand) या चार संघामध्ये सेमी फायनल रंगणार आहे. न्यूझीलंडचा संघ अधिकृतरित्या सेमी फायनलमध्ये पोहचला नसला तरी मुंबईमध्ये पहिला सेमी फायनल भारतासोबत न्यूझीलंडच खेळणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. (India vs New Zealand World Cup 2023 semi final) सेमी फायनल भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना भीती आणि उत्सुकता ही लागून राहिली आहे.
या स्पर्धेत न्युझीलंड संघाने सुरुवातीचे चार सामने दिमागदार पद्धतीने जिंकले. मात्र पुढच्या चार सामन्यात त्यांना पराभव पाहावा लागला. काल श्रीलंकेविरुद्ध झालेल्या महत्त्वाच्या सामन्यात न्युझीलंड संघाने एक हाती विजय मिळवला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने सेमी फायनल मधील आपले स्थान निश्चित केले आहे. भारत आतापर्यंत या स्पर्धेत सर्वोत्तम संघ ठरला असला तरी सेमी फायनलमध्ये न्युझीलंडचे मोठे आव्हान आहे.
भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिला असला तरी, गेल्या अनेक वर्षांमध्ये नॉक आउट सामन्यात भारतीय संघाची कामगिरी सुमार राहिली आहे. चॅम्पियन ट्रॉफी, दोन t20 वर्ल्ड कप सेमी फायनल, वर्ल्ड कप सेमी फायनल, आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव पाहावा लागला आहे.
भीतीदायक गोष्ट म्हणजे, 2019 वर्ल्ड कप सेमी फायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्युझीलंड संघानेच भारताला पराभवाची धूळ चारली होती. आता पुन्हा एकदा न्युझीलंड आणि भारत यांच्यामध्ये सेमी फायनलचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील दोन्हीं संघांचा आतापर्यंतचा खेळ पाहिला, तर भारतीय संघ अधिक समतोल आणि तुल्यबळ वाटतो. असं असलं तरी सेमी फायनलचे गणित वेगळं आहे.
न्युझीलंड संघाला चार पराभव पहावे लागले असले तरी दमदार खेळ केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 388 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंड संघाला केव्हा चार धावांनी पराभव पहावा लागला होता. शिवाय पाकिस्तान विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 400 धावांचा टप्पा ओलांडला होता. मात्र पावसामुळे न्युझीलंड संघाला पराभव पहावा लागला. त्यामुळे न्यूझीलंड संघ भारतासाठी मोठा खतरा आहे.
पहिला सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन तुल्यबळ संघांमध्ये होणार आहे. हा सामना 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. वानखेडे मैदान जलदगती गोलंदाज आणि फलंदाजांसाठी देखील अनुकूल आहे. भारतीय संघ चेसिंग करणे पसंत करतो. मात्र सुरुवातीचे काही षटके जलदगती गोलंदाजांचा चेंडू स्विंग होतो. त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे.
हे देखील वाचा ODI WC 2023 : चार वर्षात दोन World Cup जिंकणाऱ्या इंग्लंडची इतकी वाताहात का झाली?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम