धोनीच्या रिएक्शन नंतर पॉल रायफल यांनी बदलला निर्णय!
दुबईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलचा 29वा सामना आज दुबई क्रिकेट ग्राउंडवर चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यामध्ये खेळवण्यात आला. आजच्या सामन्यात पॉल रायफल यांनी धोनीच्या रिएक्शननंतर आपला निर्णय बदलण्याचा अजब प्रकार घडला.
महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबाद समोर १६८ धावांचे आव्हान ठेवले. १६९ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाला २० षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावाच करता आल्या. हैदराबादच्या संघाकडून विल्यम्सने सर्वाधिक 39 चेंडूत 57 धावांची खेळी केली.
संघाकडून एकोणिसावे षटक घेऊन आलेल्या शार्दुल ठाकूरने टाकलेला दुसरा चेंडू पंच पॉल रायफल यांनी वाईट देण्यासाठी आपले हात खोलले होते, परंतु धोनीच्या रिएक्शननंतर त्यांनी आपला निर्णय बदलल्याचा अजब प्रकार या सामन्यात घडला.
गेल्या वर्षी देखील धोनी आणि पंच यांच्यामध्ये नो बॉल विषयी वाद झाला होता. विराट कोहलीने देखील आयपीएलमधील पंचगिरी विषयी नाराजी व्यक्त केली होती. आज पुन्हा या घटनेने आयपीएलमधील पंचगिरी चव्हाट्यावर आली आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम