Virat Kohli: ..म्हणून सेल्फीसाठी धावत आलेल्या फॅनला विराटने थांबवून 23 तारखेला सेल्फी देतो असं प्रॉमिस केलं; पाहा व्हिडिओ..

0

Virat Kohli: विराट कोहलीचे (Virat kohli) चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते, काहीही करायला तयार असतात. नुकताच एक व्हिडिओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला होता ज्यामध्ये स्टेडियममधून चाहत्याने धावत थेट मैदानात प्रवेश केला होता. धावत आलेल्या चाहत्याला विराट कोहलीने देखील नाराज न करत मिठी मारली होती. आता एअरपोर्टवर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. (Virat Kohli fan selfie viral video)

सध्या विराट कोहली सुट्ट्याचा आनंद घेत आहे. ऑगस्ट पासून भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धा !asia cup 2023) खेळायची आहे. विराट कोहली सतत या ना त्याकारणामुळे नेहमी चर्चेत असतो. इंस्टाग्राम वरून विराट कोहलीच्या (Virat kohli instagram) कमाईच्या बातम्या माध्यमाने प्रसारित केल्या होत्या. मात्र या बातम्या खोट्या असल्याचं विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून जाहीर केलं. या घटनेमुळे देखील विराट कोहली सध्या चर्चेत होता. परंतु आता आणखी एका कारणामुळे विराट चर्चेत आला आहे.

एअरपोर्ट वरून जाताना एक चाहता विराट कोहलीकडे धावत आला. मला तुमच्या सोबत सेल्फी हवी आहे, असं तो म्हणाला. विराट कोहली प्रचंड घाईत होता. मात्र आपल्याकडे धावत आलेल्या चाहत्याला पुढच्या वेळेस सेल्फी देतो असं म्हणत, विराट कोहलीने त्याला वचन दिले. कोहलीने आपल्याला केलेल्या प्रॉमिसमुळे सेल्फी न मिळून देखील चाहता प्रचंड आनंदी झाला.

विराट कोहलीने चाहत्याला केलेल्या प्रॉमिमुळे विराटचे कौतुक होत आहे. सेल्फी मागायला आलेल्या चहत्याला विराट कोहली म्हणला, आता मी खूप घाईत आहे. मी या ठिकाणी 25 ऑगस्टला येणार आहे. त्यावेळेस मी तुला नक्की सेल्फी देतो, अशी भावनिक विनंती विराटने त्याला केली. दोघांच्या संभाषणाचा हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

विराट कोहली नेहमी आपल्या चात्यांना सेल्फी, फोटोग्राफ देताना पाहायला मिळाला आहे. आपल्यामुळे आपले चाहते नाराज होणार नाहीत, याची तो नेहमी पुरेपूर काळजी घेताना दिसतो. 23 ऑगस्ट हा दिवस सेल्फी मागायला आलेल्या चाहत्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल.

हे देखील वाचा IND vs WI 4th T20: ..म्हणून आजच्या सामन्यात गिलला मिळणार डच्चू; खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने संघात हे बदल..

ODI World Cup: भारत सेमीफायनलिस्ट, पण फायनल याच दोन संघात रंगेल; सेहवागने स्पष्टच सांगितले भारत फायनलमध्ये न जाण्याचे कारण..

Tilak Varma: तिलक वर्माच्या कामगिरीवर रोहितचे मोठे विधान; एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचे संकेत..

Soaked Peanuts Benefits: रोज मूठभर भिजवलेले शेंगदाणे खा, या गोष्टी बरोबरच मिळतील आरोग्याचे अनेक फायदे..

ISRO Recruitment 2023: दहावी पास असाल तर लगेच या पद्धतीने करा अर्ज; ISRO मध्ये निघालीय मोठी भरती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.