ODI World Cup: भारत सेमीफायनलिस्ट, पण फायनल याच दोन संघात रंगेल; सेहवागने स्पष्टच सांगितले भारत फायनलमध्ये न जाण्याचे कारण..
ODI World Cup: आगामी विश्वचषकाचे (ICC ODI World Cup 2023) वेध सर्वांना लागले आहेत. यावर्षी वर्ल्ड कप (ODI World Cup 2023) भारतात होणार असल्याने, भारत प्रबळ दावेदार मानला जात असला, तरी माजी दिग्गज खेळाडूंना मात्र असं वाटत नाही. क्रिकेटचे माजी दिग्गज खेळाडू आता सेमी फायनलमध्ये कोण कोण पोहोचेल? आणि फायनल कोणामध्ये होईल? याविषयी भाकीत करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी ग्लेन मैकग्रा याने देखील भारतीय चाहत्यांना धक्का देणारं प्रेडिक्ट केलं होतं. (ODI World Cup 2023 Virender Sehwag prediction)
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मैकग्राने (Glenn McGrath) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England and Australia) हे दोन संघ मला विश्वचषकाच्या दावेदारिसाठी अधिक मजबूत वाटत आहेत, असं म्हटले होते. या दोन संघाला भारतात होणाऱ्या विश्वचषकात इतर संघाच्या तुलनेत आधिक जास्त दावेदारी देण्याचे देखील कारण त्याने सांगितले होते. इंग्लंड हा गेल्या काही वर्षापासून सातत्याने एकदिवसीय क्रिकेट उत्तम प्रकारे खेळत आहे. ऑस्ट्रेलिया संघाला आयसीसी टूर्नामेंटमध्ये (ICC tournament) दबाव हाताळण्याचा सगळ्यात जास्त अनुभव असल्याचं त्याने म्हटलं होतं.
ग्लेन मैकग्रा नंतर आता भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) देखील एका कार्यक्रमात भारतात होणाऱ्या विश्वचषकामध्ये कोणते चार संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील, याविषयी भाकीत केले. एका कार्यक्रमात वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान हे चार संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.
भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकात या चार संघाला फेवरेट मानण्याचे कारण देखील वीरेंद्र सेहवागने स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाचा संघ मी या स्पर्धेत इतर संघाच्या तुलनेत जास्त प्रमाणात दावेदार असल्याचे मानतो. ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. याशिवाय मोठ्या आयसीसी स्पर्धेत दबाव कसा हाताळायचा, याविषयी त्यांना पूर्ण माहिती आहे. त्यामुळे इतर संघाच्या तुलनेत प्रबळ दावेदार हा संघ माझ्या दृष्टीने असल्याचं सेहवाग म्हणाला.
वीरेंद्र सेहवागने भारत सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार असला तरी फायनलमध्ये मात्र इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ प्रवेश करतील असे भाकीत अप्रत्यक्ष केले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन फायनल खेळतील असं त्याने स्पष्ट जरी सांगितलं नसलं, तरी या स्पर्धेतल्या दोन प्रबळ दावेदार संघांपैकी त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया याच संघाची नावे घेतली.
पुढे बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, भारत देखील एक उत्कृष्ट संघ आहे. घरच्या मैदानावर भारताचा खेळ अधिक उंचावतो. 2013 पासून भारत एकही आयसीसी स्पर्धा जिंकला नाही. त्यामुळे भारतात होणारी विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची मोठी संधी भारतीय संघाकडे आहे. मात्र दबाव हाताळण्याचे तंत्र भारतीय फलंदाजाला विकसित करावे लागेल. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची समस्या वर्ल्डकप पूर्वी सोडवावी लागेल.
मात्र आता वर्ल्ड कपला खूप कमी वेळ राहिला असल्याने, या समस्या सोडवण्यात आपण किती यशस्वी होतो, हे मला माहीत नाही. एकूण वीरेंद्र सेहवागने मधल्या फळीच्या समस्येमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नंतर भारताची दावेदारी सांगितली. वीरेंद्र सेहवागने विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ पाकिस्तान असेल असं स्पष्ट केले.
हे देखील वाचा ICC ODI World Cup 2023: युवराज म्हणतोय ते खरंच आहे, आम्ही सेट नाही; रोहितने मान्य केली युवराजने सांगितलेली ती गोष्ट..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम