शारजाहवर होणार धमाका;आंद्रे रसलच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष!

0

दुबईमध्ये सुरू असलेला आयपीएलचा २८वा सामना आज बंगलोर रॉयल चॅलेंजर विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यामध्ये शारजाह क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शारजाह हे ग्राउंड छोट आणि पाटा विकेट असल्यामुळे या ग्राउंडवर हाई स्कोरिंग सामने पाहिला मिळतात. आज पुन्हा एकदा या ग्राउंडवर प्रेक्षकांना षटकार,चौकारांची आतषबाजी पाहायला मिळू शकते.

कोलकत्ता नाइट रायडर्स संघापेक्षा यावर्षी बंगलोर रॉयल चॅलेंजर्स हा संघ तुलनेने अधिक बलवान वाटतोय. बेंगलोर चा संघ अधिक बलवान वाटत असला तरी,गेल्या दोन सामन्यांत कोलकत्ता नाइट रायडर्सचा परफॉर्मन्स पाहता त्यांना कमी लेखणं कोहलीच्या संघाला महागात पडू शकतं.

गेल्या सामन्यात आंद्रे रसेलला दुखापत झाली होती. परंतु तो फिट असून आज तो खेळणार आहे. या आयपीएलमध्ये आंद्रे रसेल ची बॅट थंड पडली आहे. परंतु या छोट्या आणि पाटा विकेट असणाऱ्या ग्राउंडवर त्याचा धमाका पहिला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन्ही संघ सहा सामन्यांमध्ये आठ गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांचे कर्णधार चांगल्या फॉर्ममध्ये असून प्रेक्षकांना या दोघांकडून चांगल्या खेळाचा अपेक्षा आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.