Marriage Tips: ..होय लग्नानंतर बदलतं आयुष्य; ‘या’ गोष्टी माहीत असतील तरच संसाराचा गाडा चालेल व्यवस्थित..
Marriage Tips: लग्नानंतर पती-पत्नी (husband wife) दोघांचेही आयुष्य बदलतं. हे वास्तव आहे. लग्नापूर्वी दोघांवरही जबाबदारी नसते. त्यामुळे लग्नापूर्वी आपले आयुष्य जगताना कोणत्याही गोष्टीची तरतोड करावी लागत नाही. लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यामध्ये स्वातंत्र्याच्या काही मर्यादा येतात. एकमेकांच्या सुखदुःखात साथ देऊन आपल्या संसाराचा गाडा हाकण्याची दोघांची ही जबाबदारी असते. मात्र अनेकांना या गोष्टीचा समतोल साधता येत नाही. आणि मग खटके उडायला सुरुवात होते. जाणून घेऊया सुखी आणि आनंदी वैवाहिक जीवनाची (married life) गुरुकिल्ली.
मानसिक तयारी
लग्नापूर्वी आणि लग्नानंतरचे आयुष्य फार वेगळं असतं. सर्वप्रथम आपण हे मान्य करून मानसिक तयारी ठेवणं आवश्यक असतं. तुमच्या आयुष्यात होणारे बदल तुम्ही मान्य करून पुढे जाणे आवश्यक असतं. लग्नापूर्वी तुमच्या खांद्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी नसते. मात्र लग्नानंतर, तुम्हाला ही जबाबदारी स्वीकारावी करावी लागते. आपला जोडीदार आपल्यासोबत कसा खुश राहील, याचा विचार करणे आवश्यक असते. लग्नानंतर आपल्यावर मोठी जबाबदारी येणार आहे, कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागेल, या सर्व गोष्टींची तुम्ही लग्नपूर्वी मानसिक तयारी करणे आवश्यक असते. तरच तुम्ही लग्नानंतर वैवाहिक आयुष्याचा आनंद घेऊ शकता.
वेळेचे व्यवस्थापन
लग्ना अगोदर आयुष्यातील सर्व वेळ तुमचा होता. मात्र लग्नानंतर ही वेळ फक्त तुमची नसणार आहे. तुमच्या वेळेत तुमचा जोडीदार देखील सहभागी आहे. या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही वेळेचे नियोजन करणे आवश्यक असते. सुखी आणि समाधानी वैवाहिक जीवन हवे असेल, तर आपल्या जोडीदाराला कॉलिटी टाईम देणे खूप आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यातला कॉलिटी टाईम जर तुम्ही जोडीदार दिला, तर जोडीदारामध्ये देखील आपला सन्मान केला जात आहे, ही भावना अधिक घट्ट होत जाते. याबरोबरच एकमेकांसोबत वेळ घालवल्याने जोडीदाराच्या आवडीनिवडी देखील समजतात.
सोशल मीडियाचा वापर
अलीकडच्या काळात सोशल मीडिया हे अनेकांचे व्यसन बनले आहे. खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जातो. सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेकदा जोडीदाराकडे दुर्लक्ष होते. जेव्हा आपल्या जोडीदाराला आपला वेळ हवा असतो, तेव्हा आपण सोशल मीडियाचा वापर करण्यात दंग असेल, तर नात्यामध्ये दुरावा यायला वेळ लागणार नाही. साहजिकच त्यामुळे जेव्हा तुम्ही घरात असता, तेव्हा सोशल मीडियाचा वापर टाळा आणि तुमच्या पती किंवा पत्नी सोबत वेळ घालवा.
त्याग
लग्नानंतर पती-पत्नी दोघांनीही काही गोष्टींमध्ये माघार घेण्यास काहीही हरकत नाही. मात्र दोघांनीही त्याग करू नये. त्यागामुळे कधीकधी समोरच्या व्यक्तीमध्ये अपराधाची भावना देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ज्या व्यक्तीने त्याग केला आहे, तो केव्हाही बोलून दाखवण्याची शक्यता असते. त्यामुळे याचा परिणाम नात्यावर होतो. आणि म्हणून दोघांनीही त्याग करण्याकडे दुर्लक्ष करायला हवं.
तडजोड
तडजोड ही सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे. पती-पत्नी दोघांनीही आपल्या वैवाहिक जीवनात तडजोड करायलाच हवी. कोणतंही नातं परिपूर्ण नसते. आयुष्य जगताना अनेकदा तडजोड करावी लागते. काही गोष्टी वेळेत मिळाल्या नाही, तरी देखील तुम्हाला संयम ठेवावा लागतो. आज एखादी गोष्ट मिळाली नाही, तर उद्या ती हमखास मिळत असते. एखाद्यावेळेस नाहीच मिळाली, तरी देखील तडजोड करून तुम्ही पुढे जाऊ शकता.
सासरच्या मंडळींना सोबत संबंध:
लग्न हे दोन कुटुंबांना एकत्र आणण्याचं काम करत असते. त्यामुळे सासरच्या मंडळींना देखील तुम्ही महत्त्व देणे आवश्यक असतं. अनेकदा पती-पत्नीमध्ये वाट देखील होत असतात. या वादावर व्यवस्थित विरजण टाकण्याचे काम अनेकदा सासरची मंडळी करत असतात. मात्र जर तुमचे नातेसंबंध सासरच्या मंडळींसोबत व्यवस्थित नसतील, तर मग तुम्हाला चुकीचे ठरवलं जातं. आणि म्हणून पत्नी बरोबर सासरच्या मंडळीसोबत देखील तुमचे नातेसंबंध व्यवस्थित असणे आवश्यक आहे.
हे देखील वाचाEPFO Recruitment 2023: बारावी आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी; या विभागामध्ये 2859 जागांसाठी भरती..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम