Good News: घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, आता ग्राहकांची…
Good News: कदाचित बऱ्याच लोकांना महिती नसेल की आपण आपल्या घरामध्ये वापरत असलेला एलपीजी गॅस सिलेंडर (Gas Cylinder) आपण वजन करून घेऊ शकतो. बऱ्याचवेळा तुम्हाला अनुभव देखील आला असेल की गॅस कधी खूपच लवकर संपून जातो. म्हणजे आपल्या घरात जी गॅस सिलेंडर येतो त्यामध्ये कधी कधी निर्धारीत गॅस वजनापेक्षा कमी गॅस देण्यात येतो. साधारण कधी कधी १ ते २ किलो कमी येतो. परंतु आता अशी गॅसची चोरी आणि ग्राहकांची होणारी लूट आता थांबणार आहे.
बऱ्याचदा गॅस सिलेंडर डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या लोकांना आपण जरी गॅसचे वजन करून मागितले तर ते लोक आपण वजन काटा घेऊन आलो नसल्याचे सांगतात. गॅस सिलेंडरमध्ये निर्धारीत करण्यात आलेल्या प्रमाणातच गॅस असल्याचे सांगतात. परंतु आपण प्रत्येक गोष्ट मोजून घेतल्याशिवाय विकत घेत नाही. मग गॅस सिलेंडरचे वजन का करून घ्यायचे नाही. परंतु आपण बऱ्याचदा याच गोष्टींचा विचार करत नसतो आणि समोरची लोक याचाच गैरफायदा घेत असतात.
परंतु आता आपल्या घरातील एलपीजी सिलिंडरमधील गॅसची होत असलेली चोरी आता थांबणार आहे. यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या गॅस सिलेंडरवरच तशी व्यवस्था करणार आहे, जेणेकरून गॅसची चोरी थांबेल आणि ग्राहकांची फसवणूक थांबेल. एलपीजी सिलिंडरमधून (LPG Cylinder) होणारी गॅस चोरी थांबण्यासाठी केंद्र सरकार सिलेंडरचे आधार कार्ड (Cylinder Aadhar Card) तयार करणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, ” आता गॅस सिलिंडरचा आधार (Gas Cylinder Aadhar) तयार करणार आहोत. हे जरी खरे आधार कार्ड नसले, कारण आधार कार्ड माणसांचे तयार होते. परंतु ते आधार कार्ड प्रमाणेच असणार आहे. केंद्र सरकार लवकरच सर्व गॅस सिलिंडरचा QR कोड तयार करत आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडरवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. यामुळे गॅसची चोरी करणारे सापडतील. हेही वाचा:Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..
कधीपासून QR कोडची सुविधा मिळणार? सर्व घरगुती गॅस सिलिंडरचा (LPG Gas Cylinder) QR कोड तयार केला जाणार आहे. याची अंमलबजावनी सुरू करण्यात आली आहे. येणाऱ्या तीन महिन्यांत सर्वच घरगुती गॅस सिलिंडरवर QR कोड देण्यात येईल. जुन्या गॅस सिलिंडरवर QR कोडचे धातूने बनवलेले स्टिकर बसवले जातील, अशी माहिती हरदीप सिंग पुरी यांनी दिली. जे नवीन गॅस सिलेंडर तयार होतील, त्यावर अगोदरच QR कोड असणार आहे. याचाच फायदा घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरांवर आळा बसण्यासाठी होणार आहे आणि सर्वसामान्य ग्राहकांची लूट थांबण्यास मदत होईल. हेही वाचा:Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..
अशा प्रकारे QR कोड आणि आधार कार्डचा फायदा होणार:
प्रत्येक गॅसचे आधार कार्ड काढण्यासाठी किंवा QR कोड तयार करण्या पाठीमागे घरगुती गॅसच्या चोरीला आळा घालणं आणि सिलेंडरला सुरक्षा मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे. जेव्हा एलपीजी गॅस सिलेंडरवर QR कोड बसवण्यात येईल तेव्हा तेव्हा गॅसचे ट्रॅकिंग सोपे होईल. सध्या ज्या सिलिंडरमध्ये कमी गॅस असल्याची तक्रार आहे, तो सिलेंडर कोणत्या डीलरचा (वितरक) आहे, हे सिद्ध करणे अवघड व्हायचे. जरी डीलरकडून (वितरक) आले आहे हे माहीत असले तरी तो सिलिंडर कोणत्या डिलिव्हरीमनने दिला हे शोधणे अवघड होते. परंतु आता सिलेंडरला QR कोड दिल्यास काही क्षणात सर्व माहिती मिळेल. यामुळे गॅसची चोरी करणाऱ्याला शोधणे सहज शक्य होईल.
QR कोडचे अजून देखील फायदे सिलेंडर कंपनीला होणार आहेत. कोणत्या सिलिंडरमध्ये किती वेळा गॅस रिफिलिंग केले आहे हे समजेल. त्याचबरोबर सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर परत येण्यासाठी किती दिवस लागतात, हे देखील समजेल. तसेच जर एखादा व्यवसायिक घरगुती गॅस सिलिंडर वापरत असताना सापडला तर ते कोणत्या डीलरकडून (वितरक) वितरित केला याचा शोध घेणे सहज शक्य होईल. थोडक्यात QR कोडमुळे गॅस सिलिंडरचा काळा बाजार रोखण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा: Reliance Jio New Recharge Plans: जिओचे नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च; जाणून घ्या सविस्तर..
IT Jobs: आयटी क्षेत्रात दोन लाख तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Best women qualities: या चार महिलांसोबत लग्न करण्याचा करा प्रयत्न; आयुष्यात येताच पालटेल नशीब..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम