Pani Foundation: आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार २५ लाख रुपये; ‘ही’ आहे अमीर खानची फार्मर कप योजना..

0

Pani Foundation: बॉलिवूडचा स्टार आणि परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमीर खान (Amir Khan) पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून घराघरात पोहचायला. वॉटर कप स्पर्धेतून आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आता अमीर खान पुन्हा एकदा गट शेती ही संकल्पना घेऊन आला आहे. यासंदर्भात त्याने एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत या स्पर्धेविषयी सविस्तर माहिती देखील दिली आहे.

अलीकडच्या काळात शेती हा व्यवसाय जुगार झाला आहे. हातातोंडाशी आलेलं पिक कधी निसर्ग हिरावून घेईल हे कोणीही सांगू शकत नाही. निसर्गापुढे कोणाचाही इलाज नाही, मात्र शेतकऱ्यांची बाजारपेठेत होणारी पिळवणूक शेतकरी स्वतः थांबवू शकतो. सोबतच कोणत्या पिकाला सर्वाधिक मागणी आहे. या विषयी तज्ञांचा सल्ला घेऊन शेती केली, तर शेतकऱ्यांना अच्छे दिन येऊ शकतात. अनेकांनी मिळून शेती केली तर उत्पादन खर्च देखील कमी येऊ शकतो, यासाठी गट शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, ही बाब लक्षात घेऊन आता अमीर खानने यासंदर्भात पाऊल उचलले आहे.

अमीर खान याने एका मध्यामाला दिलेल्या मुलाखतीत गट शेतीविषयी माहिती दिली. ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना गट शेती करण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांनी गट शेतीला जर प्राधान्य दिले, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढून उत्पादन खर्चात घट करता येणार आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी अडवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्याचे ऐतिहासिक काम करण्यात आले. साहजिकच यामुळे दुष्काळ भागात शिवार फुलवन्याचे काम करण्यात आम्हाला यश आले. शेतकऱ्यांनाआणखी प्रगल्भ आणि अभ्यासू शेतीसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गट शेतीला चालना मिळण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरेल. असे अमीर खान या स्पर्धेविषयी बोलताना म्हणाला.

अमीर खान पुढे बोलत असताना म्हणाला, माझा जन्म जर गावात झाला असता तर आज मी वेगळा असलो असतो. फिल्म आणि शेती हे दोन्हीं वेगवेगळे क्षेत्र असले तरी, दोन्हींचा जवळचा संबंध आहे. शेतीमध्ये विविधता पाहायला मिळते. बळीराजाच्या आणि आमच्या समस्या सारख्याच आहेत. आम्ही आत्तापर्यंत ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या उपक्रमावर काम केले. अनेक शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदा झालेला पाहायला मिळतो. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ उपक्रमामुळे पाण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात वाढली असून, आता केवळ पाणी प्रश्नावर काम करुन चालणार नाही, तर मृदा संवर्धन, पिक पद्धती, पाण्याचा वापर कसा करायला हवा? यासाठी आपल्याला प्रभावी कामे करावी लागणार आहेत.

काय आहे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा?

पाणी फाउंडेशनने (Pani Foundation) राज्यात ‘वॉटर कप’ (Water Cup) स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. जलसंधारणाच्या कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनला चांगले यशही मिळालेले पाहायला मिळते. जल संधरणाच्या यशस्वी वाटचालीनंतर, पाणी फाउंडेशनने आता शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी एका नवीन स्पर्धेची घोषणा केली आहे. शेतीचे उत्पादन वाढावे, आणि धरतीचा दर्जा सुधारावा हा उद्देश समोर ठेऊन, या वर्षीच्या खरीप हंगामापासून ही स्पर्धा सुरू होत असल्याची माहिती अमीरने दिली.

‘फार्मर कप’ असे या स्पर्धेला नाव देण्यात आले आहे. ही स्पर्धा राज्यस्तरावर असणार आहे. पिकनिहाय शेतकऱ्यांचे गट केले जाणार असून, राज्यात प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटाला तब्बल २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

‘सत्यमेव जयते फार्मर कप’ या स्पर्धेत २० शेतकर्‍यांचा मिळून एक गट तयार केला जाणार आहे. पिकनिहाय शेतकऱ्यांचे गट असतील. स्पर्धेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी नोंदवलेल्या पिकातील तज्ञांसह यशस्वी शेतकर्‍यांकडून मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. पीक उत्पादनासाठी आवश्यक असलेले बियाणे, पेरणी, पिकाचे औषधोपचार, पीक काढणी, या बाबींचे मार्गदर्शन देखील मोफत दिले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी कसा करता येईल, व विषमुक्त शेती याचे देखील मार्गदर्शन मिळणार आहे.

स्पर्धा आयोजित करण्याचा मुळ उद्देश

आतापर्यंत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेतून दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यामुळे त्या भागातील पाणीपातळी वाढली असून, एकत्रितरित्या येऊन आपल्या गावासाठी सामाजिक काम केल्याने लोकांच्यात एकोप्याची भावना वाढीस लागली आहे. तसेच अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. 2025 पर्यंत भुंकबळींची संख्या वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर जमिनीचे आरोग्य उत्तम असणे आणि शेतमाल वाढीव उत्पादन असणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल? या बाबी स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक अनुभव शेतकऱ्यांना येतील, आणि ते त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.

महत्वाच्या बातम्या: MSRTC Requirement 2022: एसटी महामंडळात मेगा भरती; असा करा ऑनलाइन अर्ज.. 

शेती: शेतात जाईला रस्ता नाही? चिंता करू नका, असा करा घरबसल्या अर्ज तहसिलदार येईल बांधावर.. 

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय  

Aadhaar card: आधार कार्ड हरवलंय? काळजी करू नका, या सोप्या पद्धतीने चुटकीसरशी घरबसल्या डाऊनलोड करा.. 

SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.