Pancard: दोन दिवसांत पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल दहा हजार दंड; फक्त एक ‘मेसेज’ पाठवून करु शकता लिंक..
आयकर विभागाने (income tax department) ज्या पॅन कार्ड (pancard) धारकांचे पॅन कार्ड आधारकार्डशी (aadharcard) लिंक नसेल, अशांना 31 मार्च अखेर आपलं पॅनकार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक असणार असल्याचं म्हटलं आहे. जर तुम्ही 31 मार्चपूर्वी तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही, तर तुम्हाला तब्बल दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचं देखील आयकर विभागाकडून जारी करण्यात आलं आहे.
आयकर विभागाच्या या निर्णयामुळे पॅन कार्ड धारकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या पॅनकार्ड धारकांनी त्यांचं पॅनकार्ड आधारशी लिंक केलं आहे, असे पॅन कार्ड धारक देखील आपलं पॅन आधारशी लिंक आहे की नाही? हे तपासण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळत आहेत. मात्र अजूनही तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारही लिंक केलं नसेल, तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. तुमच्या मोबाईलवरून अगदी दोन मिनिटात तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारही लिंक करू शकता. तसेच पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही? हे देखील तपासू शकता. आज आपण याच याविषयी जाणून घेणार आहोत.
असं करा लिंक
ज्या पॅनकार्ड धारकांना आपले पॅनकार्ड आधारशी लिंक करायचं आहे, आणि ज्यांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलं आहे, मात्र खात्री नाही. अशांनी आपला मोबाईल हातात घेऊन क्रोमवर जायचं आहे. क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला, www.incometax.gov.in असं सर्च करायचं आहे. तुम्ही असं सर्च केल्यानंतर, तुमच्या समोर आयकर विभागाचे अधिकृत वेबसाइट ओपन झालेली असेल. ओपन झालेल्या वेबसाईटमध्ये link aadhar हा पर्याय तुम्हाला दिसेल. या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
‘link aadhar’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या रकान्यात तुम्हाला तुमच्या आधारची सगळी माहिती व्यवस्थित भरायची आहे. मात्र जर तुम्ही यापूर्वीच तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक केलेलं असेल, तर तुम्हाला लिंक आधार या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, ‘your pan is linked to Aadhar’ असं सांगण्यात येईल. याचाच अर्थ तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक आहे, असा होतो.
‘link aadhar’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर जे नवीन पेज ओपन झालेलं आहे, त्या पेजवर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची सगळी अपडेट लिहावी लागणार आहे. ही माहिती लिहिल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता.
फक्त एसएम पाठवूनही करता येतं लिंक
पॅन कार्ड धारकांना मोबाईलवर पॅन कार्ड आधारशी लिंक करता येत नाही, किंवा हा खूप किचकट प्रकार आहे असं वाटतं, अशांसाठी देखील आयकर विभागाने अधिक सोप्प केलं आहे. जाणून घेऊया फक्त एक ‘एसएमएस’ पाठवून पॅन कार्ड आधारशी कसं लिंक करायचं.
सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल हातामध्ये घेऊन तुमच्या मेसेजमध्ये ‘UIDPAN’ ही अक्षर लिहून, ५६७६७८ किंवा ५६१६१ या नंबरवर संदेश पाठवाचा आहे. हा संदेश तुम्ही पाठवल्यानंतर तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया UIDPAN ही संस्था पार पडेल. यात तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्याच मोबाईल नंबरवरून हा संदेश पाठवायचा आहे.
हे देखील वाचा खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..
Gudipadwa 2022: ही आहे गुढीपाडवा उभारण्याची योग्य पद्धत; गुढीपाडव्याविषयी जाणून घ्या अधिक..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम