धक्कादायक! हृदयविकारामुळे नाही, ‘या’ कारणामुळे ‘शेन वॉर्न’चा झाला मृत्यू; मृत्यूच्या अगोदर बेशुद्ध अवस्थेत…

0

अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या जादुई फिरकीच्या जाळ्यात नांगी टाकायला लावणाऱ्या ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर ‘शेन वॉर्न’ (Shane Warne) यांच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून,आता त्यांच्या मृत्यची अनेक कारणे समोर यायला सुरुवात झाली आहेत. सुरुवातीला दिग्गज क्रिकेटर ‘शेन वॉर्न’ याचा मृत्यू त्याच्या कोह सामुई, थायलंड येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता वेगळंच कारण समोर येत आहे.

फिरकीचा जादूगार म्हणून, तमाम क्रिकेट (cricket) जगतावर राज्य करणारा, ऑस्ट्रेलियन (Australia) लेगस्पिनर (leg spinner) शेन वॉर्नचा वयाच्या बाविसाव्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण क्रिकेट जगतावर शोककळा पसरली असून, अनेकांना धक्का बसला आहे. क्रिकेट बरोबरच अनेक विषयांवर भाष्य करणारा शेन वॉर्न अचानक कसा निघून गेला? यावर अनेकांचा विश्वास बसत नसल्याचे, पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेन युद्धावर देखील त्याने आपली प्रतिक्रिया नोंदवली होती.

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जगभरातून खंत व्यक्त केली होती. युद्ध सुरू झालेल्या घटनेला, रशियाला जबाबदार धरत अनेकांनी रशियावर टीका केली. एवढेच नाही तर, रशियातील नागरिकांनी देखील या युद्धाला विरोध करत, आपल्याच सरकारविरोधात निदर्शने देखील केली. अनेकांप्रमाणेच शेन वॉर्नने देखील रशियाला जबाबदार धरत रशियावर टीका केली होती. रशियाने उचललेले पाऊल चुकीचे असून, हे अन्यायकारक असल्याचं देखील शेन वॉर्न आपल्या ट्वीटरवरून काही दिवसांपूर्वी म्हणाला होता.

‘नाईंटीन’मध्ये ऑस्ट्रेलियन संघ हा प्रचंड बलशाली संघ म्हणून ओळखला जात होता. या संघात गिलख्रिस्ट, हेडन, ब्रेट ली, शेन वॉर्न, पॉन्टिंग यासारखे दिग्गज खेळाडू होते. आपल्या खेळाच्या जोरावर या खेळाडूंनी अनेक वर्षं जगावार राज्य केलं. मात्र खेळाबरोबरच या संघाच्या वर्तणुकीवर देखील अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्याचं त्या वेळी पाहायला मिळालं. हा संघ जिंकण्यासाठी काहीही करू शकतो, पेंटिंगच्या संघाकडे खेळाडू वृत्ती नसल्याचा आरोप देखील त्यावेळी अनेकांकडून करण्यात आला होता.

पॉन्टिंग संघाबरोबरच, ‘शेन वॉर्न’च्या वर्तणुकीबद्दल देखील त्यावेळी प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बातम्या आल्या होत्या. शेन वॉर्न प्रचंड अल्कोहोल करत असल्याच्या बातम्या देखील त्यावेळी प्रसारित झाल्या होत्या. एवढंच नाही तर, ‘शेन वॉर्न’ ड्रग्स देखील घेत असल्याचं बोललं जात होतं. आता शेन वॉर्नच्या याच सवयीचा त्याच्या मृत्यूशी संबंध जोडला जात असल्याचं, दुर्दैवाने सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ‘शेन वॉर्न’ मृत्यूपूर्वी आपल्या थायलंडच्या घरात बेशुद्ध अवस्थेत पडला होता‌. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र तो उठू शकला नसल्याच, त्याच्या मॅनेजमेंट टिमककडून सांगण्यात आलं आहे.

‘शेन वॉर्न’च्या कुटुंबाने आम्हाला यासंदर्भात प्रायव्हसी हवी असल्याचं माध्यमांना म्हंटले आहे. आता या सगळ्या प्रकारावरून, शेन वॉर्नच्या सवयीमुळेच त्याला आपला प्राण गमवावा लागला, असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलल्याचं पाहायला मिळत आहे. कदाचित ‘शेन वॉर्न’ने मोठ्या प्रमाणात अल्कोहल घेतलं असावं. यामुळेच तो बेशुद्ध अवस्थेत पडला, आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं, सोशल मीडियावर दुर्दैवाने बोललं जात आहे. मात्र डॉक्टर आणि त्याच्या मॅनेजमेंट टीमकडून त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

हेही वाचा  बाबासाहेब आणि अमिताभ बच्चन चित्रपटात एकाच फ्रेममध्ये का दाखवले? कारण जाणून ठोकाल सलाम.!

अभिभाषण न करताच राज्यपालांनी काढला पळ; महाराष्ट्राचा अपमान करत ‘या’ कारणामुळे कोश्यारी सभागृहातून पळाले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.