मोठी बातमी! शेतकऱ्यांना (Farmer) मिळणार शेतमाल तारण कर्ज, आता शेतकऱ्यांचे काम झाले सोपे
मका व सोयाबीन पिकाच्या काढणीचे काम सध्या सुरू झाले आहे. आर्थिक चणचणीमुळे शेतकरी (Farmer) आपला शेतमाल लगेच बाजारात घेऊन येतो. त्यामुळे एकाच वेळी बाजारात आवक वाढून शेतकऱ्यांना दरात झळ बसते. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारात जर आवक कमी असेल तर नक्कीच शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळेल.
त्यामुळेच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लासलगाव बाजार समितीच्या वतीने शेतकरी तारण कर्ज योजना (Shetmal Taran Karj Yojana) सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली आहे. सन २०२१- २२ या हंगामासाठी हे कर्ज देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजने अंतर्गत लासलगाव बाजार समिती शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज देणार आहे. मका, सोयाबीन, चना व गहू या शेतमालावर हे कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. शेतमाल उत्पादक शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.
शासकीय प्रतवारीवर व बाजार समितीच्या प्रतवारीवर संयुक्तरीत्या शिफारस केलेला मका, सोयाबीन, चना व गहू हे शेतमाल ज्या दिवशी गोदामात तारण म्हणून ठेवला जाईल त्या दिवशीचा बाजारभाव विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाच्या पावतीप्रमाने शेतकऱ्यांना स्वनिधीतून तारण कर्ज धनादेशाद्वारे (चेक) देईल. हे कर्ज १८ महिन्यांच्या मुदतीपर्यंत शेतकऱ्यांना घेता येईल.
खाते उतारा व सातबारा उतारा यावरील लागवड क्षेत्र व उत्पादित माल याचे प्रमाण ठरवून त्या दिवशीच्या बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळणार आहे. हे कर्ज ६ महिन्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कर्जावर पहिल्या ६ महिन्यासाठी ६ टक्के व्याजदर आकारला जाईल. तिथून पुढच्या ६ महिन्यांसाठी ८ टक्के व्याजदर आकारला जाईल.
जाईल. मग त्यापुढील ६ महिन्यासाठी १२ टक्के व्याजदर आकारला जाईल.
लासलगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले आहे. तुम्हाला या योजनेबद्दल माहिती जाणून घ्यावयाची असेल तर तुम्हाला संपर्क करण्यासाठी एक मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर फोन करून तुम्ही योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. मो. क्र. ९९२१४२३५३६.
महत्वाच्या बातम्या: टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार
२०२४ला शिवसेना भाजपसोबत जाणार असल्याचं स्पष्ट; शरद पवारांची खेळी त्यांच्याच अंगलट
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम