Sameer wankhede: चोराच्या उलट्या बोंबा! समीर वानखेडे यांच्या धक्कादायक विधानानंतर नवाब मलिक यांनी केली चिरफाड
गांधी जयंती दिवशी मुंबई गोवा दिशेने जाणाऱ्या कार्टिलिया क्रुझवर छापा टाकत शाहरुख खानचा(shahrukh khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करणाऱ्या समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. काल आर्यन खान ड्रग्स (Aryan Khan Drug case) प्रकरणाच्या तपासासह आणखी पाच प्रकरणाच्या चौकशी वरून समीर वानखेडे यांची हकालपट्टी केल्याचं समोर आले. आणि पुन्हा एकदा समीर वानखडे अडचणीत आल्याचे दिसून आले. मात्र आता या प्रकरणावर समीर वानखेंनी अजब प्रतिक्रिया दिली आहे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा सगळा फोकस आता समीर वानखेडे यांच्याकडे असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढही होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) रोज नवनवीन खुलासे करत त्यांना पुरेपूर अडचणीत आणत आहेत. तर दुसरीकडे काल भीम आर्मी संघटनेने देखील समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रची चौकशी व्हावी, असं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. काल आर्यन खान ड्रग्स प्रकरणासह आणखी पाच प्रकरणाच्या चौकशी वरून समीर वानखेडे यांची हकालपट्टी केली आहे.
समीर वानखेडे यांची एकूण सहा प्रकरणाच्या चौकशीमधून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना समीर वानखेडे म्हणाले, या चौकशींमधून मला काढण्यात आलं नाही, तर मीच या प्रकरणाच्या चौकशींचा तपास केंद्रीय यंत्रणांनी करावा अशी मागणी केली होती. वानखेडे यांनी केलेल्या या दाव्याला आता पुन्हा नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Wankhede has no where mentioned about the formation of SIT to probe Aryan Khan or any other case. His petition was about corruption allegations which @MumbaiPolice is probing should be given to CBI or NIA & the same petition was disposed off by the court. https://t.co/7MC3LPVdhq pic.twitter.com/LQP1D4vpCZ
— فیضان خان FaizanKhan (@journofaizan) November 5, 2021
समीर वानखेडे यांच्या दाव्याचा समाचार घेताना नवाब मलिक यांनी म्हटले आहे, समीर वानखेडे हे देशाची दिशाभूल करत आहेत. देशाला सत्य काय आहे ते समजायला हवं. आपल्या प्रकरणाची चौकशी ही मुंबई पोलिसांकडून(mumbai police) न होता केंद्रीय यंत्रणांकडूच व्हावी, अशी याचिका देखील मुंबई उच्च न्यायालयात समीर वानखेडे यांनी दाखल केली होती. असा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांची ही मागणी फेटाळून लावली आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी आपल्या ट्विट मधून दिली आहे.
I had demanded an S.I.T probe to investigate Sameer Dawood Wankhede for kidnapping of & ransom demand from Aryan Khan.
Now 2 S.I.Ts are constituted (state & centre), let us see who brings out the skeletons from the closet of Wankhede and exposes him and his nefarious private army— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 6, 2021
आर्यन खानचं अपहरण आणि खंडणी प्रकरणात समीर वानखेडेंची चौकशी करण्यासाठी केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी समित्या नेमण्यात आल्या असून, त्यांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. ही माहिती देत असताना मलिक यांनी म्हटले आहे ,पाहूयात या प्रकरणाचा सत्य तपास कोण लावतंय. हे प्रकरण आता चांगलंच रंगतदार अवस्थेत आलं असून, या प्रकरणात नेमका दोषी कोण आहे? याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम