मोठी बातमी! महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या, शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही सर्वाधिक

0

भविष्यात जेव्हा कधी 2020 या वर्षाचा उल्लेख होईल केला जाईल तेव्हा तेव्हा कोरोना महामारीचा उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही. कोरोना महामारीचा उल्लेख झाल्यावर सर्वांच्या डोळ्यांसमोर चित्र येतं ते म्हणजे ऑक्सिजन,उपचारांविना तडफडणाऱ्या रुग्णांचे, रस्त्यावरून जाणाऱ्या अँब्युलन्सचा आवाज, स्मशानभूमीमध्ये कोरीना महामारीत आपला जीव गमावलेल्या लागलेल्या रांगेची, त्याचसोबत एका शहरातून दुसऱ्या शहरांत, परराज्यात जाणाऱ्या रुग्णांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

कोरोना महामारीच्या काळात मजुरांचे आजारपणाबरोबरच जेवणाचेही हाल झाले होते. असा दुहेरी फटका मजुरांना बसला होता. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2020 या वर्षातील अॅक्सिडेंटल डेथ्स अँड सुसाईड्स यांचा अहवाल आला आहे. 2020 या वर्षामध्ये सर्वाधिक आत्महत्या ह्या हातावर पोट असणाऱ्या मजुरांनी केल्या असल्याचं या अहवालामधून समोर आले होते.

2020 मध्ये आपल्या देशात सुमारे 1 लाख 53 हजार लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. या आकडेवारीनुसार सर्वाधिक म्हणजेच तब्बल 37 हजार रोजंदारी मजूर होते. देशात झालेल्या एकूण 1लाख 53 हजार आत्महत्यांपैकी 19,909 आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. कौटुंबिक कारणांतून आत्महत्या करणाऱ्यां लोकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे एका अहवालानुसार उघड झाले आहे.

देशात एकूण आत्महत्या करणाऱ्या लोकामध्ये सर्वाधिक तामिळनाडूचे मजूर होते. तामिळनाडूखालोखाल मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण आणि गुजरातमधील मजूरांची संख्या आहे. परंतु मिळालेल्या या अहवालामध्ये मजुरांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्टपणे सांगितले गेले नाही. मार्च 2020 महिना अखेरीस देशात कुठलीही व कसलीही कल्पना न देता लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या लॉकडाऊनमध्ये आपण कामगारांच्या स्थलांतराची दृश्ये आपण सर्वांनी पाहिली होती.

नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार शालेय परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळेही अनेक विद्यार्थ्यांनी टोकाच पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
आत्महत्येच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये 18 वर्षांपेक्षा खालील वयातील मुली आणि मुले यांच्यामध्ये सुध्दा स्पष्ट फरक दिसून येतो. प्रेम प्रकरणाशी संबंधित ताणतणावामुळे मुलींनी जीव गमावल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आत्महत्या ही एक आपल्या देशासह गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्ही किंवा तुमचा मित्र, नातेवाईक एखाद्या गोष्टीबाबत तणावात असाल तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाईन क्रमांक 1800 2333 330 या क्रमांकावर फोन करून तुम्ही मोफत मार्गदर्शन घेऊ शकता.

नव्या कृषि कायद्याच्या विरोधामध्ये पंजाब, हरियानासह देशातील विविध भागांत शेतकरी गेल्या 11 महिन्यांपासून आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होय असल्याचे देखील या अहवालात सांगण्यात आले आहे. नवे शेतकरी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्यामुळे या कायद्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, असं मत आंदोलकांनी व्यक्त केला.

केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी समिती यांच्यामध्ये 11 टप्प्यांमध्ये चर्चा झाली. परंतु या चर्चेमधून काहीही हाती आले नाही.
परंतु, NRCB च्या अहवालानुसार शेतकरी आंदोलनाचा संबंध या शेतकरी आत्महत्येशी आहे किंवा नाही, याचा कसलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. आपण काहीही शेअर करत असतो आम्हाला वाटतंय ही बातमी पण तुम्ही नक्की शेअर कराल अशी अपेक्षा आहे. कारण आत्महत्या ही देशातील फार मोठी समस्या होत चालली आहे.

हेही वाचा-आर्यन खान ड्रग्स प्रकरण: ड्रग्स माफिया जयदीप राणा; आणि अमृता फडणवीस यांचा फोटो व्हायरल; नवाब मलिक यांनी उघड केला संबंध

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची एंट्री; समीर वानखेडे फडणवीस कनेक्शन उघड

T20 World Cup 2021:तीन तिघाड काम बिघाड!  आहेत पराभवची कारणे,भारत साखळीतच गारद! टी-ट्वेन्टी नंतर वनडेचही जाणार कर्णधारपद

मोठी बातमी! जात प्रमाणपत्रारावरून समीर वानखेडेच्या अडचणीत होणार वाढ, धनंजय मुंडे म्हणाले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.