आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे, याची आम्हाला माहितीच नाही, आर्यनची सुटका नाहीच
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा ट्विस्ट दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. २ आक्टोंबर पासून ड्रग्स प्रकरणात अटकेत असणाऱ्या आर्यन खानला काल मुंबई उच्च न्यायालयाने शेवटी जामीन मंजूर केला. आणि २५ दिवसांनंतर आर्यन खान आपल्या मन्नत बंगल्यावर जाणार हे स्पष्ट झालं. मात्र पुन्हा एकदा आर्यन खान जामीन प्रकरणात ट्विस्ट आला असून काल जामीन मंजूर होउनही आर्यन खानला आजची रात्र देखील आर्थर जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे.
कार्डीलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक आल्यानंतर आर्यन खानने सत्र न्यायालयात दोन वेळा जामीन अर्ज केला मात्र तरीदेखील आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला गेला. दोन वेळा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने आर्यन खानने २० तारखेला मुंबई उच्च न्यायलयात जामीन अर्ज दाखल केला. जामीनासाठी दोन वेळा सत्र न्यायालयात अपील केले होते. या याचिकेवर २६ तारखेला सुनावणी झाली. ही सुनावणी सलग तीन दिवस चालल्यानंतर काल २८ तारखेला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला जामीन मजूर केला.
आर्यनला जामीन मंजूर झाला असून देखील त्याला आर्थर रोडजेल मधून सुटका झाली नाही. काल मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला मात्र कोर्टाचे अधिकृत लेटर आर्थररोड जेलच्या अधिकाऱ्यांपर्यंत आज दुपारर्यंत पोहचेल असं बोललं जात होत. मात्र आज ५:३० वाजे पर्यंत हे लेटर आले नसल्याने आर्यन खानला आम्हला सोडता येत नसल्याचे आर्थर रोडजेल अधिकाऱ्यांनी सांगितले. आणि आर्यन खानची आजची रात्र देखील जेलमध्ये असणार हे स्पष्ट झाले.
कुणासाठीही नियम बदलले जाणार नाहीत. संध्याकाळी साडेपाच वाजता जामिनासाठी आम्ही पत्र पेटी उघडली होती. मात्र त्यामध्ये आम्हाला न्यायालयाचा आदेश सापडला नाही. त्यामुळे आर्यनची आज जेलमधून सुटका होणार नाही,अशी माहिती आर्थर रोड जेल प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आर्थर रोड जेल प्रशासनाने आर्यनला सोडण्यास नकार दिलेला आहे. तसेच आर्यनला उद्या सकाळीजेल मधून सोडण्यात येईल, अशी माहिती आर्थर रोड जेल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बऱ्याच अटीतटीच्या प्रयत्नानंतर आर्यनचा जामीन केला गेला होता. आर्यनच्या जामीन मंजूर व्हावा यासाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी, वकील मानेशिंदे यांच्यासह अनेक वकिलांचा फौजफाटा उभा करण्यात आला होता. काल शाहरुख खानचा वकिलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. काल शाहरुखचे फॅन्स गुजरात, छत्तीसगड व इतर राज्यांमधून मुंबई येथील मन्नतबाहेर जल्लोष करताना पाहायला मिळाले. परंतु त्यांच्या आनंदावर थोड्या काळापुरते का होईना विरजण पडले आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.