‘एनसीबी’ची शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरही धाड; ‘हे’ आहे धाडीचे कारण
गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देशाची हेडलाईन बनलाय. दोन ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूजवर एनसीबीने छापा टाकला. आणि आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. गेल्या १८ दिवसांपासून आर्यन खान न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. अजूनही त्याला जामीन मिळालेला नाही. काल जामीन याचीकेवर झालेल्या सुनावणीत देखील त्याचा जामीन अर्ज न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी फेटाळून लावला. सध्या तो मुंबईच्या आर्थर जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.
आर्यन खानला अटक झाल्यापासून शाहरुख खानला त्याला भेटता आलं नव्हतं. आज सकाळी शाहरुख खान मुलाला भेटण्यासाठी आर्थर जेलमध्ये पोचला होता. एकीकडे शारुख खान आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर जेलमध्ये पोचला,तर दुसरीकडे एनसीबीचे अधिकारी शाहरुख खानच्या बांद्रा येथे असणाऱ्या मन्नत घरावर धाड टाकण्यासाठी पोहचले असल्याच्या बातम्या झळकल्या.
मात्र आता एनसीबीचे अधिकारी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर चौकशीसाठी नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी गेल्याचे समोर आले आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचे अधिकारी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर आता समोर येत आहे.
शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर आम्ही पोहोचण्याचं कारण म्हणजे ही काही रेड नव्हती. आर्यन खान याला 2 ऑक्टोंबरला अटक केल्यानंतर आमचे काही पेपर वर्क बाकी होते. त्यासंदर्भात आम्ही याठीकाणी आलो असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांने एका मीडियाशी संवाद साधताना सांगितले.
सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी ड्रग्स प्रकरणातला आरोपी आर्यन खानची याचिका फेटाळून लावल्यामुळे आर्यन खानच्या वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या जामिनावर आता मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी २६ तारखेला सुनावणी होणार आहे.
हेही वाचा- टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार
काल कोर्टाने आर्यन खानचा जामीन का फेटाळला? कारण जाणून बसेल धक्का
एनसीबीची शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरही धाड; हे आहे धाडीचे कारण
शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला; व्हीडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम