lakhimpur kheri incident: जय जवान जय किसान! हा नारा देणाऱ्या’लाल बहादूर शास्त्री’यांच्या जयंती नंतर एकाच दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाने चिरडलं?
मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत असून देखील केंद्र सरकार हे कायदे माघार घ्यायला तयार नाही.
केंद्र सरकारने लागू केलेल्या,
1)शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य विधेयक,
2) शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक,
3)अत्यावश्यक वस्तू विधेयक या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी या कायद्याविरोधात आंदोलन करत असून सुद्धा केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत हे कायदे माघार घेतले जाणार नाहीत,असं स्पष्ट केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त आहे.
गाझीपुर सीमेवर गेल्या वर्षी हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत लाखोच्या संख्येने शेतकरी या कायद्याविरोधात आंदोलन करताना दिसून आले होते. मात्र केंद्र सरकारने शेतकरी दिल्लीत घुसू नये म्हणून,अक्षरशः रस्त्यावर भले मोठे खिळे ठोकले. एवढेच नाही तर रस्तादेखील खोदल्याचा अजब प्रकार समोर आला होता.
#Delhi_border@post_offical#delhi_farmers_protest pic.twitter.com/62eZ1QtI8R
— Journalist.ZUBAIR.CHOUDHARY (@ZUBAIR_HK_NEWS) February 5, 2021
भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हे शेतकरी आंदोलन नसून,हे आंदोलनजीवी असल्याचं अजब वक्तव्य केलं होतं. पंतप्रधानांनी केलेल्या या वाक्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.
शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सकारात्मक विचार न करता भाजपकडून जाणीवपूर्वक त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार होत असल्याचा,आरोप विरोधक सातत्याने करत होते.
लोग चाहते हैं कि पीड़ितों को न्याय मिले लेकिन भाजपा के मंत्री का बेटा होने की वजह से कोई कार्रवाई नहीं की जा रही है। उत्तर प्रदेश में पूरी तरह से गुंडा राज कायम हो चुका है: लखीमपुर खीरी की घटना पर तेजस्वी यादव, आरजेडी pic.twitter.com/eKAn2li6NH
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2021
गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्राने शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत आपल्या अकलेचे तारे तोडले होते. सर्व स्तरातील टीका झाल्यानंतर या महाशयांनी माफीही मागितली होती. मात्र काल त्यांच्याच मुलावर उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांना चार चाकीने चिरडल्याचा आरोप होत असल्याने संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील निगासन तहसीच्या टिकुनिया परिसरात काल दुपारी शेतकऱ्यांविरोधात हिंसाचार घडला. या हिंसाचाराचे आरोप केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्राच्या मुलावर करण्यात आले आहेत.
Eight persons have died in Lakhimpur incident, says Additional SP Arun Kumar Singh
— ANI UP (@ANINewsUP) October 3, 2021
काल झालेल्या या हिंसाचारात एकूण आठ जणांना आपला बळी गमवावा लागलाय. या घटनेचू राज्यभर पडसाद उमटू लागले असून,दोषींवर कधी कारवाई होणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.