गाडीच्या नंबर साठी तब्बल 34 लाख मोजले. काय आहे कारण? जाणून घ्या अधिक.
हॉलिवूडमधील जेम्स बॉन्ड सिनेमांच्या सीरिजचे जगभरात लाखो करोडो चाहते आहेत. भारतातदेखील जेम्स बॉन्डचे दिवाणे आहेत. जेम्स बॉन्ड म्हटलं की त्याचा प्रसिद्ध सिक्रेट कोड ‘007’ सगळ्यांच्या लक्षात येते. गुजरातच्या अहमदाबादमधील आशिक पटेल हे सुध्दा जेम्स बॉन्डचे फॅन आहेत. आशिक पटेल यांनी 39 लाख पन्नास हजाराची टोयोटा फॉर्च्युनर कार विकत घेतली आहे. त्यांची आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवर 007 असायलाच हवे अशी इच्छा होती. काहीही झाले तरी गाडीला 007 हा नंबर घ्यायचा असा त्यांनी निश्चय केला होता. मात्र हा नंबर पण सहजासहजी मिळत नाहीं कारण या नंबरला देखील खूप मागणी असते. हा नंबर सहजासहजी मिळणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी 007 या नंबरसाठी तब्बल 34 लाख रुपये मोजले आहेत.
गुजरात मधील अहमदाबाद आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, एका फॅन्सी नंबर प्लेटसाठी 34 लाखांची बोली गेल्या काही दिवसातील सर्वात मोठी रक्कम आहे. ३४ लाख रुपये रक्कम मिळाल्यानंतर आशिक पटेल यांना त्यांचा व्हीआयपी नंबर दिला जाणार आहे.
कोरोनामुळे आलेल्या मंदीच्या काळात व्हीआयपी नंबर लिलावात सहभाग घेणाऱ्यांची संख्या घटली असली तरी काही मंडळी याला अपवाद असतात. त्यापैकीच अशिक पटेल हे एक नाव.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम