अमित शहा यांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी लावला धुडकावून! काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर?

0

वादग्रस्त शेती कायद्याविरोधात संपूर्ण देशभरातील अनेक भागांमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले. हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यात कृषी विधेयक कायद्याविरुद्ध खूप तीव्र आंदोलन झाल्याचे पाहायला मिळाल्यानंतर अखेर भारत सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीच्या निरंकारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. मात्र सरकाने आम्हाला दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी या कायद्याचा निषेध म्हणून रविवारी सलग चौथ्या दिवशीही आपला विरोध कायम ठेवला आहे.

अनेक शेतकरी सिंघु आणि टिकरी सीमेवर कृषी विधेयक कायद्याविरोधात आपलं प्रदर्शन करत आहेत. या शेतकऱ्यांचे म्हणणं आहे,आम्हाला निरंकारी नाही तर जंतर-मंतर या मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही इथून हलणार नाही. अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. सरकार शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्यावर चर्चा करण्यास तयार आहे. हा जो काही संदेश अमित शहा यांनी दिला होता,तो फोल ठरल्याचे दिसून येत आहे.

अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि सरकार शेतकऱ्याच्या प्रत्येक समस्येवर, प्रश्नावर चर्चा करण्यास तयार आहे,अशी माहिती दिली होती. त्याचबरोबर त्यांनी निरंकारी या मैदानावर शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास काहीही हरकत नाही,असंही म्हटलं होतं. मात्र शेतकऱ्यांनी आम्हाला जंतरमंतर या मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी द्यावी. अशी भूमिका घेतल्याने,हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.