धीरज मुटके यांनी मानले सर्वांचे आभार!

0


चाकण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष धीरज प्रकाश मुटके यांच्या नगरसेवक पदाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे.

धीरज मुटके म्हणतात, ही पाच वर्ष कशी गेली कळलेच नाही. सर्व प्रशासन, कर्मचारी, सर्व सहकारी नगरसेवक, नातेवाईक, सर्व चाकणकर,  राजकीय मार्गदर्शक, माझे मुटके, गोसावी, भुरुक, मांजरे, कुटुंबीय, मित्रमंडळी, तसेच पूर्ण २३ प्रभागमधील सर्वच मतदार राजा यांच्या सहकार्याने संपूर्ण चाकण शहरात  बरेच धोरणे राबवण्याचा प्रयत्न केला. माझ्या पूर्ण प्रभागात अल्प वेळेत संपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कदाचित काही तांत्रिक कारणामुळे काही कामे करण्याची राहिली असल्यास ती सुध्दा भविष्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.

नजरचुकीने माझ्याकडून काही चूक झाली असल्यास आपलाच समजून माफ करावे. जरी माझा कार्यकाळ संपला असेल, भविष्यात मी कोणत्या पदावर असेल नसेल तरीही मी कायम आपल्या सेवेस हजर असणार आहे. अशा पद्धतीने धीरज प्रकाश मुटके यांनी जनतेचे, सर्व सहकारी नगरसेवक, मित्रमंडळी, नातेवाईक, यांचे आभार मानले आहेत.
खालील लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा!

https://chat.whatsapp.com/EHnhAgJiN8bFOrUsETh5re

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.

WhatsApp Group