आमदार उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरासह, कीर्तन, व्याख्यानाचे आयोजन

0

आमदार उत्तमराव जानकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी वेळापूर येथे विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्य, समाजप्रबोधन आणि जनजागृतीला प्राधान्य देत दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सकाळी ९.३० वाजता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वेळापूर येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे (सर) यांचे “लक्षात नसलेला बाप” या विषयावर समाजप्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
त्यानंतर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत जामदार कॉम्प्लेक्स, गरुड बंगल्यासमोर, वेळापूर येथे सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, कर्करोग, नेत्ररोग, दंतरोग, स्त्रीरोग, बालरोग, रक्त तपासणी आदी विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे.

सायंकाळी ६.३० वाजता पालखी मैदान, वेळापूर येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन अमोल (भैय्या) पनासे मित्र परिवार, वेळापूर यांच्या वतीने करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक, आरोग्यविषयक आणि आध्यात्मिक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयोजक अमोल (भैय्या) पनासे हे आमदार उत्तमराव जानकर यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. वेळापूर पंचक्रोशीतील प्रभावी युवा नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनहिताच्या उपक्रमांचे ते सातत्याने आयोजन करत असतात. त्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमुळे हजारो नागरिकांना विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवांचा लाभ मिळाला आहे. यंदाही आमदार उत्तमराव जानकर यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.