Pune: रूपाली पाटलांच्या बदनामीसाठी पत्रकारांनाच 25 लाखाची सुपारी..?

सिनिअर पत्रकाराने दोन ज्युनिअर सोबत रचला गलिच्छ सापळा..? त्या दोन पत्रकारांना महिलेने का चोपले..?

0

Pune: पुण्याला वैभवशाली पत्रकारितेची परंपरा आहे. मात्र ही वैभवशाली परंपरा काही सुपारीबाज पत्रकारांनी धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा, धक्कादायक आरोप रूपाली पाटील ठोंबरे (rupali Patil thombre) यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी दोन पत्रकाराला बुधवार पेठेत (budhawarpeth) महिलेकडू मारहाण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मारहाणीचे नेमके कारण, आणि नक्की कोण पत्रकार होते, याविषयी अनेकांच्या मनात अनेक प्रश्न होते. अखेर या प्रश्नाची उत्तरे मिळाली असून, आता या प्रकरणाचा छडा लावण्याची संपूर्ण जबाबदारी पुणे पोलिसांवर (pune police) आली आहे.

आज सकाळी पत्रकार परिषद घेत रूपाली पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम सांगितला. या पत्रकार परिषदेमध्ये रूपाली ठोंबरे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. पत्रकारांनीच माझी बदनामी करण्यासाठी 25 लाखाची सुपारी घेतल्याचा धक्कादायक आणि गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाल्या रूपाली पाटील ठोंबरे..? 

आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या म्हणाल्या, रोहन कदम (rohan kadam) नावाच्या पत्रकाराला महिलेने केलेल्या मारहाणीमुळे सगळं समोर आलं. रोहन कदम यांनी बुधवार पेठेत एका लॉजवर आराम करण्यासाठी रूम घेतली. तिथे तो दारू पिला. आणि त्यानंतर त्याने शेजारी एका महिलेचा गुपचुप व्हिडिओ काढला. महिलेच्या हे लक्षात आल्यानंतर तिने आरडा-ओरडा केला. चपलेने त्याला मारहाण केली. अनेकजण जमा झाले.

मारहाण झाल्यानंतर रोहन कदम लॉज मॅनेजरला म्हणाला, हे हॉटेल रूपाली पाटील यांच्या नातेवाईकांचे आहे, त्यांना इथे बोलावा. हे लॉज आमच्या नातेवाईकांचे आहे, याविषयी रोहन कदम या पत्रकाराला माहिती कशी मिळाली, हा प्रश्न उपस्थित झाला. आणि मग या प्रकारात आम्ही गंभीरतेने लक्ष घातले.

पुढे त्या म्हणाल्या, आमच्या काही सोर्सने सांगितले, तुमच्या पक्षातल्या महिलेनेच तुमची बदनामी करण्यासाठी पत्रकारांना 25 लाख रुपये दिले. यामध्ये एक-दोन सिनिअर पत्रकार आणि दोन ज्युनिअर पत्रकार आहेत. सिनिअर पत्रकाराने प्रत्येकी ज्युनिअर पत्रकारांना दोन-दोन लाख रुपये, अशी ही डील होती. मात्र महिलेने त्याला मारहाण केल्यामुळे त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही.

या पत्रकार परिषदेमध्ये रूपाली पाटील यांनी 25 लाख रुपये कोणी आणि कोणत्या पत्रकाराला दिले, हे स्पष्ट केलं नाही. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी, आमच्या पक्षातील शून्य किंमत असलेली महिला यापाठीमागे आहे, असा उल्लेख केला. यावरून या प्रकारामागे रूपाली चाकणकरच असल्याचं त्यांना सुचवायचं होतं, असं आता बोललं जाऊ लागलं आहे.

रूपाली पाटील यांनी रोहन कदम सोडून कोणत्याही दुसऱ्या पत्रकाराचे नाव घेतले नाही. मात्र या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या पत्रकारांची नावे मी पोलिसांना दिली आहेत, हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

रोहन कदम याच्यावर पोलिसांनी FIR दाखल केली आहे. ग्राहकासोबत शारीरिक संबंध झाल्यानंतर साडी बदलत असताना रोहन कदम याने व्हिडिओ काढल्याची तक्रार संबंधित महिलेने दिली आहे. आम्ही चार जण आहोत, आणि स्टिंग ऑपरेशन करतोय, असं रोहन कदमने सांगितल्याचेही महिलेने FIR मध्ये म्हटलं आहे. मात्र या FIR मध्ये उर्वरित तिघांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

अशातच आता रोहन कदम सोबत आणखी कोण-कोण होते, याविषयी चर्चा सुरू असतानाच @gajabhauX नावाच्या x हॅण्डल वरुण काही पत्रकाराच्या नावाचा खुलासा केला आहे, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

गजाभाऊने नावे केली उघड…

आज पुण्याच्या प्रकरणात शेवटी पत्रकारांनी त्रागा केल्यानंतर, जय महाराष्ट्रच्या पत्रकारावर केस झाली. या सगळ्याचा सुपारी घेणारा मास्टर माईंड वैभव सोनवणे आहे. याबाबत रुपाली पाटील ठोंबरे यांनी तक्रार दिली आहे. पत्रकार मोना येनपुरे, (mona yenpure)अक्षय बडवे, (Akshay badve) किरण शिंदे, (kiran Shinde) अमोल धर्माधिकारी (amol dharmadhikari) आणि रोहन कदम या सगळ्यांनी मिळून पैसे उकळण्याचा कार्यक्रम आखला असल्याचंही त्याने आपल्या X अकाउंट वरून म्हटले आहे.

https://x.com/i/status/2042812152960999710

याशिवाय रोहन कदम बरोबर अभिजित पोटे (abhijit pote) यालाही मारहाण झाली. वैभव सोनवणे खाली होता, म्हणून तो वाचला. महत्वाचे म्हणजे, मुरली अन्नांनी काल फोनाफोनी केली. पुण्याचा सीपी मॅनेज झाला होता, पण पत्रकारांच्या रेट्यापुढे FIR झाली. असाही दावा त्याने आपल्या x हॅण्डल वरुण केला आहे. पुण्यात गुंड सुपाऱ्या घेतच होते, पण आता पोलीसही सुपाऱ्या घेत आहे, नेते सुपारी घेत आहेत. आणि शेवटी पत्रकार पण सुपारी घेऊ लागली, असाही दावा त्याने केला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

https://x.com/i/status/2042900803409887334

कोण आहे गजाभाऊ…?

2024 मध्ये महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी एक डिसेंबरला मोहित कंबोज यांनी आपल्या x हॅण्डल वरुण गजाभाऊ नावाच्या व्यक्तीला धमकी दिली होती. कंबोज भाजपचे कार्यकर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. मोहित कंबोज यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून म्हटले होते, पुढचे टारगेट गजाभाऊ. तू कुठेही असला तरी तुला उचलून आणणार असं म्हणत धमकी दिली होती. त्यानंतर अंबादास दानवे, संजय राऊत, रोहित पवार यांनी या प्रकारावर टीका केली होती. आणि तेव्हापासून गजाभाऊ हे नाव चर्चेत आले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.