IPL 2024 MI : पत्नी रितिका नंतर रोहित शर्माचाही मुंबई इंडियन्सवर पलटवार; कमेंट करून म्हणाला..

0

IPL 2024 MI : रोहित शर्मा (rohit sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) रितिका सजदेह (ritika sajdeh) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या चौघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने काही ना काही घडताना पाहायला मिळत आहे. कधी मुंबई इंडियन सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित शर्माचा अपमान करताना पाहायला मिळते. तर कधी हार्दिक पांड्या इंस्टाग्रामवर पोस्ट करून रोहित शर्माला डिवचताना पाहायला मिळतो. या सगळ्यांचा समाचार म्हणून, रोहीची पत्नी रितिका देखील जोरदार पलटवार करताना दिसून येते. आता रोहित शर्माने देखील या सगळ्या सोशल मीडिया वादात उडी घेतली आहे.

रोहित शर्मा (rohit sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तिघांमध्ये सगळं काही आलबेल राहिलेलं नाही. तिघांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झाले आहेत. तिघांमध्ये असणारे मतभेद इतके टोकाला गेले आहेत, की आता रोहित शर्माची फॅमिली आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवू लागली आहे. इतकच नाही, तर एक प्रकारे आमच्यावर अन्याय झाला असल्याचं, देखील दोन दिवसापूर्वी रितिकाने अप्रत्यक्षरीत्या म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन संघाचा कोच मार्क बाऊचरने रोहित शर्माला कर्णधार पदावरून का काढून टाकले, याविषयी खुलासा केला. मात्र रितिकाने मार्क बाऊचरने मनघडत कहाणी सांगितली असल्याचं म्हंटले. रितिकाच्या पलटवारानंतर मुंबई इंडियन्सच्या सांगण्यावरून मार्क बाऊचरच्या (Mark baucher)  मुलाखतीचा व्हिडिओ डिलीटही करण्यात आला. आता या वादात स्वतः रोहित शर्माने उडी घेतली आहे.

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याची तयारी आता सुरू झाली असून, रोहित शर्माला हॉटेलमध्ये जात असताना स्पॉट करण्यात आले. रोहित शर्मा सोबत रितिका देखील होती. रोहित शर्माने दोघांचा एकत्रित फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्याचा थेट संबंध मार्क बाऊचरशी जोडला जात आहे.

रोहित शर्माने आपली पत्नी रितिका सोबत चालत असतानाचा एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. इंस्टाग्रामवर फोटोच्या खाली त्याने कॅप्शन देखील दिलं आहे. ज्याची चर्चा जोरदार सुरू आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे. माझ्या बाजूने कायम उभी राहणारी रितिका. अशा स्वरूपात त्याने एका वाक्यात मुंबई इंडियन्सला टार्गेट केल्याचं बोललं जात आहे. माझ्यावर अन्याय होत असताना ती माझी भक्कमपणे बाजू सांभाळते असं, देखील रोहितला सांगायचं असल्याचं बोललं जात आहे.

हे देखील वाचा  Rohit Sharma hardik Pandya : रोहित, हार्दिकचं एकमेकांविरुद्ध सोशल मीडिया वॉर; मुंबई इंडियन्स नाईलाजाने घेणार हा मोठा निर्णय..

India squad announced for last 3 test : उर्वरित तीन कसोटीसाठी आश्चर्यकारक संघाची घोषणा; श्रेयस बाहेर, विराटवरही BCCI चे मोठे विधान..

Jadejas father allegations: घरी सासऱ्याचा छळ, कॅमेऱ्यापुढे मात्र डोक्यावर पदर; पाच वर्षापासून पोराचं तोंडही पाहू दिलं नाही..

Ravindra Jadeja on Father Anirudhsinh Jadeja : बायकोचा गुलाम, संपत्ती पत्नीच्या नावावर; सासरच्याने.., वडलांच्या आरोपानंतर रवींद्र जडेजाचे धक्कादायक विधान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.