Jadeja’s father allegations: घरी सासऱ्याचा छळ, कॅमेऱ्यापुढे मात्र डोक्यावर पदर; पाच वर्षापासून पोराचं तोंडही पाहू दिलं नाही..
Jadeja’s father allegations: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (ravindra jadeja) सध्या चांगलाच अडचणीत सापडला असून, सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात येत आहे. ट्रोल होण्याचे कारणही धक्कादायक असून, रवींद्र जडेजाच्या वडिलांनी गंभीर आरोप केल्याने, एकच खळबळ उडाली आहे. (Jadeja’s father allegations against daughter-in-law)
रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) ही भाजपची आमदार असून सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल देखील झाले आहेत. रीवाबा स्वतःला सनातनी हिंदू मानते. आमच्या सनातन हिंदू धर्मात पतीचा आदर करायला शिकवला आहे. मोठ्यांचा आदर करायला शिकवला आहे. डोक्यावर नेहमी पदर असायला हवा, एका मुलाखतीमध्ये असे देखील म्हणताना पाहायला मिळाली होती. वस्तुस्थिती मात्र वेगळीच असून, तिच्या सासऱ्याने धक्कादायक खुलासा केल्याने खळबळ उडाली आहे.
रवींद्र जडेजाने वडील अनिरुद्धसिंह जडेजा (Anirudh Singh Jadeja) यांनी दैनिक जागरणला दिलेल्या इंटरव्यू मध्ये आपला मुलगा रवींद्र जडेजा (ravindra jadeja) आणि सून रीवाबा जडेजा याविषयी अनेक खुलासे केले आहेत. ज्याची संध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा म्हणतात, माझे आणि माझ्या मुलाचे संबंध कधीच संपले आहेत. जडेजाचे लग्न झाल्यानंतर, काही महिन्यात वादाला सुरुवात झाली. एका शहरात राहून देखील आम्ही गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांचे तोंड पाहिले नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
लग्न झाल्यानंतर तीन महिन्यानंतर वादाला सुरुवात झाली. मी सध्या जामनगरमध्ये राहतो. मला माहित नाही माझ्या मुलावर रिवाबाने काय जादू केली. जडेजा मला कधीच बोलवत नाही. आणि मी देखील त्याला बोलवत नाही. आमच्यामध्ये आता कोणतेही नातं राहिले नाही. इतकच नाही, तर जडेजाचे वडील म्हणाले, खूप बरं झालं असतं, जर त्याचं लग्न झालं नसतं. तो क्रिकेटर बनला नसता तर आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला नसता. असाही संताप त्यांनी व्यक्त केल्याने, सोशल मीडियावर रवींद्र जडेजाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
जडेजाचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा पुढे म्हणाले, पाच वर्षापासून मी माझ्या नातीचा चेहरा पाहू शकलो नाही. माझी सून रीवाबा पहिल्यापासून एक स्वातंत्र्य जीवन जगू इच्छित होती. परिवारासोबत राहिला तिला कधीच आवडत नव्हतं. इतकंच नाही, तर जडेजाची सगळे संपत्ती तिने स्वतःच्या नावावर केली आहे. माझ्या मुलावर सासरच्या मंडळीचे सगळं नियंत्रण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Mauris Noronha: अभिषेक घोसाळकर हत्त्या प्रकरणात नवा ट्विस्ट; मारेकरी दुसराच, मॉरिसला त्यानेच संपवलं.
Rohit Sharma Delhi capitals captain : रोहित शर्मा दिल्ली संघाचा नवा कर्णधार; ऋषभ पंत या भूमिकेत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम