India squad announced for last 3 test : उर्वरित तीन कसोटीसाठी आश्चर्यकारक संघाची घोषणा; श्रेयस बाहेर, विराटवरही BCCI चे मोठे विधान..
India squad announced for last 3 test : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठीचा संघ अखेर जाहीर करण्यात आला आहे. (India squad announced for last 3 against England) भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला असल्याने, तिसऱ्या कसोटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला असल्याने, पाच कसोटी सामन्याची मालिका रंगतदार अवस्थेत आली आहे. मात्र अशातच विराट कोहली (Virat Kohli) या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्याने भारतीय संघाच्या फलंदाजांवर आता अधिकचा दबाव आला आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजी फारशी आश्वासक राहिली नव्हती. यशस्वी जयस्वाल (yashaswi jaiswal) वगळता भारताच्या इतर फलंदाजांना अपयश आले आहे. शुभमन गिलने (shubman gill) शतक झळकावले असले, तरी त्याच्या खेळात सातत्याचा अभाव आहे.
विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटीतून यापूर्वीच माघार घेतली होती. आता मात्र विराट कोहली उर्वरित तीन कसोटी सामने देखील खेळताना दिसणार नाही. बीसीसीआयने (BCCI) विराटच्या निर्णयाविषयी भाष्य देखील केलं आहे. विराट कोहलीने घेतलेल्या निर्णयाचे बीसीसीआयकडून स्वागत करण्यात आले असून, त्याच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, असं सांगण्यात आले आहे.
पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सपशेल अपयशी ठरला होता. श्रेयसच्या खराब फॉर्मचा फटका त्याला बसला असून, उर्वरित तीन कसोटी सामन्यातून श्रेयस अय्यरला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलला (dhruv jurel) संधी देण्यात आली आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या सरफराज खानला (sarfaraaz khan) भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार आहे.
रवींद्र जडेजा आणि केएल राहुल (ravindra jadeja and KL Rahul) अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झाले नसल्याने, त्यांचा पूर्णपणे भारतीय संघात समावेश करण्यात आला नाही. मात्र सब्जेक्ट टू फिटनेस अंतर्गत दोघांनाही स्टॅन्डबाय खेळाडू म्हणून संघासोबत ठेवण्यात आले आहे. 15 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रवींद्र जडेजा आणि केएल राहुल पूर्णपणे फिट झाल्यानंतर, भारतीय संघात दोघांचाही समावेश केला जाणार आहे.
ध्रुव जुरेल आणि आकाश दीप या दोघांना कसोटीमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. आकाश दीप (akash deep) आणि जूरेल दोघेही तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात येणार होती. मात्र या मालिकेचे महत्त्व लक्षात घेऊन, जसप्रीत बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे. विकेट किपर फलंदाज केएस भरतला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मात्र तो प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची शक्यता फार कमी आहे. मोहम्मद सिराजचे देखील उर्वरित तीन कसोटी सामन्यात पुनरागमन झाले आहे.
हे देखील वाचा Rohit Sharma hardik Pandya : रोहित, हार्दिकचं एकमेकांविरुद्ध सोशल मीडिया वॉर; मुंबई इंडियन्स नाईलाजाने घेणार हा मोठा निर्णय..
Rohit Sharma Delhi capitals captain : रोहित शर्मा दिल्ली संघाचा नवा कर्णधार; ऋषभ पंत या भूमिकेत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम