Rohit Sharma on T20 World Cup: T20 मध्ये मीच कर्णधार असणार; रोहितने या शब्दात साधला पांड्यावर निशाणा..

0

Rohit Sharma on T20 World Cup: रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहलीसाठी (Virat Kohli) महत्त्वपूर्ण मानली जाणारी अफगाणिस्तान विरुद्धची टी-ट्वेंटी मालिका नुकतीच पार पडली. तीन टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत भारताने अफगाणिस्तानला व्हाइट वॉश दिला. विश्वचषकापूर्वी ही अखेरची टी ट्वेंटी मालिका असल्याने, या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. त्यातच विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळपास १४ महिन्यातून अधिक काळ टी-ट्वेंटी क्रिकेट पासून दूर राहिले होते. त्यामुळे या दोघांच्या कमबॅककडे अनेकांचे लक्ष होतं. साहजिकच या सगळ्यांमुळे अनेकांच्या नजरा टी ट्वेंटी सिरीजकडे होत्या.

2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषका नंतर भारतीय टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आले होते. मात्र टी ट्वेंटी विश्वचषक सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा T20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) देण्यात आले. रोहित शर्मा बरोबर विराट कोहलीची देखील टी-20 संघात निवड करण्यात आली. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहलीची निवड करण्यात आल्यामुळे हार्दिकचे कर्णधारपदाचे स्वप्न भंगणार असल्याचे बोलले गेले. आता मात्र अधिकृतरित्या हार्दिक पांड्या हा t-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा कर्णधार नसणार हे स्पष्ट झाले आहे. स्वतः रोहित शर्माने ट्वेंटी विश्वचषकाविषयी आपली भूमिका स्पष्ट केल्याने, क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चाही रंगली आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध तिसरा T20 सामना पार पडल्यानंतर, रोहित शर्माने जिओ सिनेमाशी संवाद साधला. या संवादामध्ये त्याने गोष्टींवर भाष्य केलं. (Rohit Sharma talking Jio cinema) रोहित शर्माला विचारण्यात आलं, नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात तुम्ही दहा सामने जिंकला. मात्र फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव विसरून पुढे जाणे किती आव्हानात्मक होतं? रोहित शर्माला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो तुम्हाला, नक्कीच आव्हानात्मक होते.

मी लहानपणापासून एकदिवसीय विश्वचषक पाहत आलो आहे. माझ्या दृष्टीने एकदिवसीय वर्ल्ड कप सगळ्यात महत्वपूर्ण आहे. याचा अर्थ t20 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला मी इम्पॉर्टन्स देत नाही, असं नाही. मात्र माझ्या दृष्टीने एकदिवसीय वर्ल्ड कप खूप महत्त्वाचा होता. मात्र आम्ही तो जिंकू शकलो नाही. आमच्या संघातील सर्व खेळाडू प्रचंड दुखी होते. आमच्याबरोबर लोक देखील दुखावले होते. पण तुम्हाला पुढे जावं लागते.

एकादिवसीय विश्वचषक आम्ही जिंकण्यात अपयशी ठरलो. मात्र यावर्षी आणखी एक विश्वचषक येत आहे. टी ट्वेंटी विश्वचषक जिंकून आम्ही झालेल्या दुःखावर विरजण टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू. 2022 नंतर मी टी ट्वेंटी सामना खेळलो नाही. मात्र आमचा प्लॅन काय असेल, याविषयी आमची बातचीत सुरू आहे. नऊ दहा खेळाडू जवळपास निश्चित आहेत. वेस्टइंडीज मधील खेळपट्टी स्लो असल्याने आम्हाला त्या दृष्टीने संग निवड करायचा आहे.

रोहित शर्माने केलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाविषयी केलेल्या विधानामुळे हार्दिक पांड्याची टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदासाठी वर्णी लागेल, या आशा जवळपास मावळल्या आहेत. हार्दिक पांड्यावर निशाणा साधण्यासाठीच रोहित शर्माने t20 विश्वचषकावर स्पष्टपणे भाष्य केलं असल्याचंही बोलले जात आहे. हार्दिक पांद्याला मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार केल्यानंतर, दोघांचे संबंध ताणले गेले आहेत. हे काही आता लपून राहिले नाहीत.

हे देखील वाचा Rohit Sharma Trade window: असा होणार रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघात ट्रेड; नाईलाजाने अखेर मुंबई इंडियन्सचाही हिरवा कंदील..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.