Virat Kohli T20 world Cup: Virat kohli पुन्हा BCCI च्या टार्गेटवर; T20 World Cup साठी विराट ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर या खेळाडूला संधी..
Virat Kohli T20 world Cup: वनडे विश्वचषकात भारतीय संघाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचे खेळाडू आणि चाहतेही प्रचंड निराश झाले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनलमध्ये झालेला पराभव विसरून पुन्हा विश्वविजेता होण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. पुढील वर्षी वेस्टइंडीजमध्ये होणारा टी ट्वेंटी विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकण्याची संधी भारताकडे आहे.
2022 मध्ये झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) ऐवजी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) t20 संघाचे नेतृत्व देण्यात आले. मात्र आता दोन वर्षानंतर पुन्हा रोहित शर्मा हाच टी ट्वेंटी संघाचा कर्णधार असेल, याविषयी शिक्कमोर्तब झाले आहे. रोहित शर्मा आणि बीसीसीआय (BCCI ) अधिकाऱ्यांची यासंदर्भात मीटिंग देखील झाली.
2024 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. एकीकडे रोहित शर्मा t20 संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र दुसरीकडे t20 संघात विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर पहिल्या पसंतीचा खेळाडू म्हणून नसणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) ऐवजी ईशान किशनला (Ishan Kishan) तिसऱ्या क्रमांकासाठी प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये तिसऱ्या क्रमांकावर विराट ऐवजी ईशान किशन पहिली पसंती असल्याचं सांगण्यात आले आहे. बीसीसीआय अधिकाऱ्यांनी देखील याविषयी अधिक चर्चा केली असून, विराट कोहलीला या संदर्भात विचारणा केली गेली आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी एका आग्रेसिव्ह खेळाडूचा संघात समावेश करण्यात यावा. यासाठी विराट कोहली ऐवजी ईशान किशनचा टी ट्वेंटी विश्वचषक संघात समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. दोघांच्या टी ट्वेंटी करिअर स्ट्राइक रेट विषयी बोलायचं झाल्यास, विराट कोहलीचा टी ट्वेंटी करिअर स्ट्राइक रेट ईशान किशन पेक्षाही अधिक आहे. त्यामुळे बीसीसीआयचा हा निर्णय अनेकांच्या समजण्यापलीकडचा विषय आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत 115 t20 सामने खेळले आहेत. यामध्ये तब्बल 52 ची सरासरी आणि 138 च्या स्ट्राइक रेटने त्याने 4008 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे ईशान किशनने आतापर्यंत 32 टी ट्वेंटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 796 धावा केल्या आहेत. महत्वाचं म्हणजेया धावा त्याने केवळ 25 ची सरासरी आणि 124.4 च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत.
ईशान किशन पेक्षा विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर प्रचंड उजवा आहे. मात्र तरी देखील ईशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर पहिली पसंती देण्यात येत आहे. जाणीवपूर्वक विराट कोहलीला टार्गेट करण्यासाठी बीसीसीआय अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. अशा निर्णयामुळे केवळ भारतीय क्रिकेटचेच नुकसान होत असल्याचे सोशल मीडियावर बोललं जात आहे.
हे देखील वाचा Rohit Sharma BCCI meeting: रोहित शर्माचा BCCI ला सवाल, अन् हार्दिक पांड्या पुन्हा अडचणी..
T20 World Cup: रोहित शर्माच्या कर्णधार पदाला आव्हान दिले; आता तोच T-20 World Cup मधून आउट..
Chanakya Niti on youngster: तारुण्यात करा या गोष्टी; अन्यथा म्हातारपणात भोगाल नरक यातना..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम