Lottery tragedy: कोटीची लॉटरी लागली, प्रियकराने पत्नीसह पैसेही पळवले; पुढं जे झालं ते वाचून थक्क व्हाल..
Lottery tragedy: आजकाल कधी काय होईल याचा नेम नाही. बाहेरच्या दुनियेत आपली फसवणूक करण्यासाठी इतर लोक आहेतच. तसेच चोरी, दरोडा टाकणारे देखील आहेत. आपण त्यांच्यापासून सावध राहू शकतो. स्वतःची फसवणूक किंवा चोरी दरोडा होणार नाही एवढी काळजी घेऊ शकतो. तसेच विश्वासघात करणारे लोक देखील आपल्याला पावलोपावली पाहायला मिळतात. आपले बरेच ओळखीचे लोक देखील व्यवहारांमध्ये आपली फसवणूक करतात. (Lottery tragedy)
बाहेरच्या जगातल्या या सगळ्या गोष्टी आपण कदाचित सहन करू. परंतु जेव्हा आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो, जिच्यासाठी आपलं आयुष्य आपण जगत असतो; त्याच व्यक्तीने आपली फसवणूक केली, तर काय अवस्था होईल हे शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. आजकाल जर नात्यामधीलच विश्वास राहिला नाही, तर विश्वास म्हणून आपण पाहायचं तरी कोणाकडे हा प्रश्न उपस्थित होतो. अशा घटना कुणाच्याही बाबतीत न घडो.
पाठीमागच्या चार-पाच दिवसांमध्ये एका महिलेने आपल्याच पतीला गळा दाबून संपवले. त्यानंतर महिलेने आपल्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला. तिचे नाटक तिने व्यवस्थित पार पडल्याने कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला कसलाही संशय आला नाही. परंतु कुठलीही गोष्ट लपून राहत नसते, हे देखील खरं आहे. ज्यावेळी त्या महिलेने पतीला संपवले, त्यानंतर तिने तिच्या प्रियकराला फोन केला होता. त्यावेळी त्या महिलेने आपण कशा पद्धतीने आपल्या पतीला संपवले, हे त्याला फोनवरून सांगितले होते. रेकॉर्ड झालेला कॉल सदर महिलेच्या मुलीने ऐकला. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार देऊन गुन्ह्याला वाचा फोडली.
एका व्यक्तीला एक कोटी रुपयांची लॉटरी लागली. त्या लॉटरीमधून जे काही रक्कम त्या व्यक्तीला मिळणार होती, ती रक्कम त्याने आपल्या बायकोच्या बँक खात्यावर पाठवली (Lottery tragedy) वास्तविक पाहता यात गैर असे काही नाही. कारण कुणाचीही पत्नी त्या व्यक्तीची अर्धांगिनी असते. परंतु आपल्या पत्नीच्या बँक खात्यावर पैसे पाठवणे त्या व्यक्तीला चांगलेच भोवले आहे. त्यामुळे त्याला एक कोटी एवढी मोठी रक्कम गमवावी लागली आहे.
प्रत्येकाला असे वाटत असते की माझ्याकडे एकदम मोठी रक्कम यावी. ज्यामुळे मला माझी सर्व स्वप्न पूर्ण करता येतील. त्यासाठी बरेच लोक लॉटरी सारखा पर्याय वापरतात. त्या व्यक्तीने लॉटरीचे तिकीट विकत घेतले. त्या व्यक्तीचे नशीब देखील कदाचित चांगले असावे, त्या प्रमाणे त्या व्यक्तीला तब्बल एक कोटी रुपयांची लॉटरी लागली. मग काय त्याने तर सर्व पैसे आपल्या पत्नीच्या खात्यावर जमा केले. कदाचित त्याची अशी भावना असेल की, पत्नीच्या खात्यावर पैसे सुरक्षित राहतील.
परंतु त्याच झालं असं की, पतीने पत्नीच्या खात्यावर पैसे पाठवल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात मोठा भुकंपच घडला. एकीकडे लॉटरी लागली आणि पैसे पत्नीच्या खात्यावर जमा केले. पत्नीने याचाच फायदा घेत, आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली. त्यामुळे त्या व्यक्तीचे पैसेही गेले आणि बायकोही गेली. सदर घटना ही थायलंडमध्ये घडली आहे. परंतु ही घटना पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. ज्या विश्वासाने पतीने पत्नीच्या खात्यावर पैसे जमा केले. त्या विश्वासाला पत्नीने केराची टोपली दाखवली.
मानित असे त्या 49 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. तो थायलंड मधील इसान प्रांतात राहतो. नोव्हेंबर (2022) महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 1 कोटी 36 लाख रुपयांची लॉटरी जिंकली. त्यामधून लॉटरीवरील कर (Tax) जमा केल्यानंतर 1 कोटी 30 लाख रुपये एवढी रक्कम मनित यांच्या खात्यावर जमा झाली. त्यांनी 1 कोटी 30 लाख रुपये त्यांच्या 45 वर्षीय अंगकानारात हिच्या खात्यावर पाठवले. एवढी मोठी रक्कम आल्यानंतर कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. ते त्या रकमेतून त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार होते.
मानित सांगतात, आमच्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाली होती. आम्हाला तीन मुले आहेत. आमचा संसार सुखाचा चालला होता, आमच्यामध्ये सगळं काही सुरळीत सुरू होते. त्यामुळे मला कधीही अशी शंका आली नाही. तिच्या खात्यावर पैसे जमा केल्यानंतर देखील पत्नीच्या वर्तनात काहीही बदल पाहायला मिळाला नाही. परंतु एके दिवशी पत्नी अचानकच गायब झाली. त्यांनी आपली पत्नी आणि तिच्या प्रियकराविरूध्द पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
सगळं काही सुरळीत सुरु होते. आम्ही लॉटरी जिंकल्यावर एका मंदिराला २० लाख रुपये देणगी देण्याचा निर्णय घेतला होता. लॉटरी लागल्यामुळे नातेवाईक आणि मित्र मित्रपरिवार यांच्यासाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत मानित त्यांच्या पत्नी अंगकानारासह एक व्यक्ती आला होता. त्याला मी ओळखत नव्हतो. त्या व्यक्तीबद्दल विचारल्यावर पत्नीने तिचा पाहुणा असल्याचे मला सांगितले होते. परंतु पार्टीत आलेला व्यक्ती अंगकानारात हीचा प्रियकर निघाला. त्यांच्यासोबतच आपली पत्नी पैशासह गायब झाली आहे. तिला सध्या कसलाही संपर्क करता येत नाही. असे पोलिसांना सांगितले.
परंतु कायदेशीर कारण दाखवत लॉटरीची रक्कम मानीत यांना परत मिळू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कारण बँकेचे अकाउंट हे अंगकानारात हिचे आहे. तिच्या बँक खात्यावर स्वेच्छेने पैसे पाठवण्यात आले आहेत. मानित आणि त्यांची पत्नी अंगकानारात यांचे कायदेशीर प्रक्रियेने लग्न झालेले नाही. याचे कारण असे की त्या दोघांनी कधीही विवाह प्रमाणपत्रावर सही केलेली नाही. त्यामुळे कायदेशीरपणे पत्नीची त्यांची नाही आणि पत्नीच्या खात्यावर असलेले पैसे देखील त्यांचे नाहीत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम