Farmer: दोन लाख रुपये देतो म्हटलं तरी, पोरगी कोणी देत नाही शेतकऱ्याचा पोराला..,”; शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्याची व्यथा ऐकून..

0

Farmer: सोशल मीडियाच्या (social media) या जमान्यात कधी काय व्हायरल (viral video) होईल, हे काही सांगता येत नाही. शेतकऱ्याची अवस्था कोणालाही वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. अनेकदा शेतकऱ्याला (farmer) सांगितलं जातं, अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी स्वतःचा माल स्वतःच विकणे आवश्यक आहे. मात्र स्वतःचा शेतमाल विकायला गेलेल्या, शेतकऱ्यांची देखील बाजारात काय अवस्था होती, हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. शेतकरी कधी-कधी वैतागून आपला शेतमाल रस्त्यावर ओतून देखील मोकळ्या हाताने घरी परततो. याविषयी देखील आपण अनेकदा ऐकलं वाचलं असेल. बाजारात घेऊन गेलेला शेतमाल विकला गेला नाही, तर घरी घेउन जायला परवडत देखील नाही. अगदी गाडी भाडे देखील मिळत नाही. या संदर्भातले अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोलापूरच्या (Solapur) ‘वैराग’ या बाजारामधला आहे. या शेतकऱ्याचे नाव समजू शकले नाही, मात्र हा शेतकरी आसपासच्याच परिसरातील असल्याचं बोललं जातयं. वैराग मधील बाजारात हा शेतकरी स्वतःच्या रानातील लिंबू घेऊन विक्रीसाठी आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या शेतकऱ्याकडे लिंबू कोणीही खरेदी करताना पाहायला मिळत नसल्यानं, शेतकरी प्रचंड वैतागल्याचं पाहायला मिळत आहे. आपण पाहतो, अनेक जण आपला शेतमाल विकण्यासाठी अनेक युक्त्या चालवतात. असं म्हटलं जातं, बोलणाऱ्याचे अंबाडे विकले जातात, पण न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. कदाचित यामुळेच या शेतकऱ्यांनी लिंबू विकण्यासाठी युक्ती चालल्याचं पाहायला मिळत आहे.

“घेतंय का कोण? लिंबू दहा रुपयाला दोन, का लाव शरद पवाराला फोन. होशील का शेतकरी करशील का बागायत? आणशील का वैराग्याचा बाजाराला” या पद्धतीने हा लिंबू विक्रेता शेतकरी मोठ-मोठ्याने ओरडताना पाहायला मिळत असून, आसपास असणारे अनेक लोक या शेतकऱ्याकडे पाहत आहेत, मात्र लिंबू खरेदी करताना कोणीही दिसत नाही. हा शेतकरी नंतर कोणालातरी आपली व्यथा सांगताना म्हणतो, दोन लाख रुपये देतो म्हटलं तरी पोरगी कोणी देईना शेतकऱ्याच्या पोराला, काय शेतकऱ्याची व्यथा लेकहो, शेतकरी थांबला तर जग थांबेल, हे ध्यानात ठेवा.

दहा एकर बागायत असूनही, माझ्या पोराला कोणी पोरगी देईना मामा, असं हा शेतकरी शेजारी कोणालातरी सांगताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शेती करण्यापासून शेतमाल विकेपर्यंत शेतकऱ्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात लूटमार होते, हे प्रत्येकाला माहित आहे. स्वतःचा शेतमाल स्वतः विकायला गेलं तर, शेतमाल विकला जाईल, याची कुठलीही शाश्वती नसते. आणि यामुळे शेतकरी भर बाजारात प्रचंड संतापल्याचे चित्र पाहायला मिळते. हा शेतकरी देखील अशा अनेक समस्यांमुळे वैतागल्याचं पाहायला मिळत आहे.

शेती करणे अलीकडच्या काळात जुगार पेक्षा कमी नसल्याचं बोललं जातं. प्रचंड मेहनत करून, शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं, हातातोंडाशी आलेला घास अचानक अवकाळी पाऊस हिरावून घेतो. अवकाळी पावसातून शेतमाल वाचला, तर पुढे बाजारात त्याला चांगला भाव मिळेल, याची शाश्वती नसते. सहाजिकच अशा अनेक संकटामुळे शेतकऱ्याच्या उत्पादक खर्च देखील निघत नसल्याचे पाहायला मिळते. शेती या एकाच व्यवसायावर शेतकरी अवलंबून असल्याने त्याला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागतं. मुलांचं शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न, अशी अनेक कामे शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असतात. हे कमी की काय म्हणून, आता शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी देखील द्यायला तयार नसल्याचं, अलीकडच्या काळात अधिकतेने जाणवतं. हा शेतकरी देखील या सगळ्या गोष्टींना वैतागल्याने आपला संताप व्यक्त करताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Maharashtra Police Recruitment 2022: सर्वात मोठी ब्रेकिंग! राज्यात ऑगस्टमध्ये एकाचवेळी तब्बल 13 हजार पोलिस कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती..

IPL 2022 Update: क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांवर वादळ आणि पावसाचं सावट; ..तर RCB आणि LSG न खेळताच जाणार बाहेर..

government job: ३४ विभागात एकूण १लाख रिक्त पदांची मेगा भरती होणार या तारखेला; राज्य सरकारने दिला हिरवा कंदील..

Today’s Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर! स्टीलच्या किंमतीत झाली मोठी घसरण, येणाऱ्या काही दिवसात तब्बल एवढ्या हजारांनी होणार घसरण

LPG GAS SUBSIDY: फक्त याच गॅस धारकांना मिळणार २०० रूपये अनुदान; तुम्हीही घेऊ शकता लाभ, अशी करा नोंदणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.