PM kisan: ‘या’ कारणामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला लागतोय वेळ..
PM Kisan: भारत हा कृषीप्रधान देश असल्याने देशातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीला आणि शेतकऱ्याला चांगले दिवस आल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थती सुधारण्याच्या उद्देशाने अनेक योजना शासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना आर्थिक मदत होत आहे. तसेच या योजनेमुळे शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारे आर्थिक भांडवल मिळत आहे. त्यामुळे ही योजना गरीब शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची वाटते.
पंतप्रधान किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. प्रत्येक चार महिन्यांनी योजनेचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. आत्तापर्यंत १० हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. ११ व्या हफ्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पहात आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा दहावा हफ्ता १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला आहे. योजनेचा ११ वा हफ्ता १५ मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा होत आहे. परंतु शासनाने कुठेही अधिकृतपणे याबाबत जाहीर केले नाही.
एकाच कुटुंबातील किती लोकांना घेता येईल योजनेचा लाभ?
पीएम किसान योजनेसाठी काही नियमावली तयार करण्यात आली आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो का? जर लाभार्थ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर तो एक प्रकारे गुन्हा आहे. पीएम किसान योजनेचे पैसे कुटुंबातील फक्त एका सदस्याला मिळू शकतात. कुटुंबातील दुसऱ्या सदस्याने योजनेचा आर्थिक फायदा घेतल्यास त्याच्यावर कारवाई करून पैसेही वसूल केले जातात.
ई केवायसी कशी कराल?
ई केवायसी करणं खूप सोपं आहे. ज्या शेतकऱ्यांना स्मार्टफोन वापरता येत असेल तर ते शेतकरी अगदी घरच्या घरी देखील ई केवायसी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राउजर मध्ये जावून पंतप्रधान किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल. अर्थात https://pmkisan.gov.in/ वर जा. ‘फार्मर्स कॉर्नर’ अंतर्गत असलेल्या ई-केवायसी टॅबवर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. तिथे आधार क्रमांकाची माहिती देऊन सर्च टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. त्या ठिकाणी आलेला OTP टाईप करून ‘Submit OTP’ वर क्लिक करा आणि OTP टाकून सबमिट करा. यानंतर संपूर्ण प्रक्रिया पार पडेल.
शेतकऱ्याच्या खात्यात ११वा हफ्ता जमा व्हायला का वेळ लागतोय?
गेल्या वर्षीपर्यंत सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी ( PM kisan Scheme E-KYC) करायला सक्ती केली नव्हती. परंतु, या वर्षापासून या योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना सरकारने 31 मे पर्यंत सर्व ई केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे देखील 11 वा हप्ता मिळण्यास वेळ लागत आहे.
यासोबतच पीएम किसान सन्मान योजनेचा (PM kisan Samman Scheme) लाभ अशा लोकांना देखील मिळाला आहे की, जे या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत. बऱ्याच सरकारी नोकरदारांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे सरकारने आता या योजनेसाठी नियमावली तयार केली आहे. ज्या सरकारी नोकरदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा लोकांकडून वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे. हे देखील 11वा हप्ता मिळण्यास विलंब होत असल्याचे कारण आहे.
पीएम किसान योजनेत आता काही बदल देखील करण्यात आले आहेत. यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला ५ एकरपेक्षा कमी जमीन असणे आवश्यक होते.परंतु सरकारने या नियमात आता बदल केला आहे. सरकारने ही मर्यादा हटवली आहे. त्यामुळे आता अनेक नवीन शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. ( PM kisan Samman Scheme) त्याचसोबत आता सरकारने या वर्षापासून किसान क्रेडिट कार्ड पीएम किसान पोर्टलशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देखील पीएम किसान योजनेचा (PM kisan Scheme) 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला वेळ लागत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Online shopping: ‘या’ सरकारी वेबसाईटवर आहे अनेक वस्तूंवर बंपर ऑफर; लॅपटॉप तर केवळ..
Pani Foundation: आता या शेतकऱ्यांना मिळणार २५ लाख रुपये; ही आहे अमीर खानची फार्मर कप योजना..
टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार
SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम